नागपूर : यामध्ये फिर्यादी, मृतकाचा भाऊ आणि पुतण्या यांची साक्ष ग्राह्यय धरली तसेच आरोपीच्या कपड्यावरील रक्त आणि मृतकाचे डीएन रिपोर्ट न्यायालयाने ग्राह्य धरला आहे. सदर प्रकरणाचा तपास एमआयडीसी बोरीचे पोलीस निरिक्षक ठाकरे यांनी केला आणि न्यायालयात सरकार तर्फे संपूर्ण प्रकरण सहाय्यक सरकारी वकील ॲड अभय जिकार यांनी हाताळले आणि फिर्यादी तर्फे मदतनीस म्हणून ॲड. मंगेश निलजकर यांनी सहकार्य केले.
प्रकरणाची माहीती : १९ डिसेंम्बर २०१९ रोजी कामडी परीवरातील सर्व सदस्य आपल्या घरी असताना रात्री ८ ते ९ दरम्यान आरोपी प्रकाश मसराम आणि त्याचा भाऊ रणजीत हे मोटार सायकल ने घरासमोर आले व पती किशोर कामडी याला घराबाहेर बोलावले. तेव्हा, फिर्यादीसुध्दा घराबाहेर आली. तेव्हा आरोपी प्रकाश मसराम याने लोखंडी रॉड आणि इतर साहित्यांनी मारण्यास सुरवात केली, तेव्हा आरडाओरड केल्यामुळे दिर बिभीषण कामडी बाहेर आले आणि प्रकाश मसरामला समजावत असताना प्रकाश मसरामने बिभीषणच्या बिभीषण कामडीच्या डोक्यावर वार केला, त्यामुळे ते रोडवर पडले.