महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

क्षुल्लक भांडणातून एकाची हत्या : पाच आरोपी गजाआड, एका विधिसंघर्ष बालकाचा समावेश

लकडगंज पोलीस ठाण्याचा हद्दीतील मस्कासाथ पुलाजवळ छत्तीसगडच्या भिलाई येथील रहिवासी असलेल्या सुभाष विश्वकर्मा यांची ५ आरोपींनी चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही हत्या क्षुल्लक वादातून करण्यात आल्याची माहिती आहे.

शुल्लक भांडणातून एकाची हत्या
शुल्लक भांडणातून एकाची हत्या

By

Published : Feb 16, 2020, 11:41 PM IST

Updated : Feb 17, 2020, 4:04 AM IST

नागपूर - येथील लकडगंज पोलीस ठाण्याचा हद्दीतील मस्कासाथ पुलाजवळ छत्तीसगडच्या भिलाई येथील रहिवासी असलेल्या सुभाष विश्वकर्मा यांची ५ आरोपींनी चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. सुभाषचा खून केल्यानंतर आरोपी त्या ठिकाणावरुन पळून गेले. मात्र, पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे. अटक करण्यात आरोपींमध्ये एका विधीसंघर्ष बालकाचा समावेश आहे.

नागपूरमध्ये क्षुल्लक भांडणातून एकाची हत्या ...

या घटनेतील तक्रारदार तुषार देवघरे हा त्याचा मित्र सुभाष विश्वकर्मा सोबत दुचाकी ने मस्कासाथ पुलावरुन जात असताना सुभाषने लगुशंकेकरीता गाडी थांबविली. सुभाष पुलावरुन खाली उतरून लगुशंकेला गेल्याच्या काहीएक मिनिटांनंतर काही आरोपी धारधार शस्त्र घेऊन सुभाषच्या मागे पळत असल्याचे तक्रादाराच्या निदर्शनास आले. काही समजण्यापूर्वीच आरोपींनी सुभाषला गाठून त्याच्यावर हल्ला चढवला. त्या आरोपींपैकी एकाने त्याच्या जवळील धारदार शस्त्र सुभाषच्या पोटात भोसकले, ज्यामुळे तो जागेवरच मृत झाला. त्यानंतर सर्व आरोपींनी अंधाराचा गैरफायदा घेऊन घटनास्थळून पळ काढला. मात्र, पोलिसांनी अवघ्या काही तासातच या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली तेव्हा सुभाषच्या हत्येमागील कारण ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला.

हेही वाचा -धक्कादायक! चिमुकल्यांच्या अश्लील चित्रफिती संकेत स्थळावर, उपराजधानीत गुन्हे दाखल

जेव्हा सुभाष पूलाखाली लघुशंका करण्यासाठी गेला तेव्हा ५ आरोपी आधीच तिथे बसलेले होते. तिथे गेल्यानंतर सुभाषने त्या आरोपींना शिवीगाळ केली. ज्यामुळे उद्भवलेल्या वादातून सुभाषची हत्या करण्यात आली, असल्याचे आरोपींनी सांगितल्याची माहिती आहे.

हेही वाचा -तुकाराम मुंढेंच्या एका निर्णयामुळे आयुक्त विरुद्ध नगरसेवक रंगणार सामना

Last Updated : Feb 17, 2020, 4:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details