महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मार्केटिंगमध्ये अव्वल असलेल्या सरकारला जनतेच्या समस्यांचे घेणे-देणे नाही -  मल्लिकार्जुन खरगे

सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या सरकारने महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवरून दूर केले आहे. तसेच भाजप सरकार केवळ मार्केटिंगच करण्यात पटाईत असून जनतेचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यात त्यांना काहीही रस नसल्याचा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

मल्लिकार्जुन खरगे

By

Published : Oct 16, 2019, 12:24 AM IST

Updated : Oct 16, 2019, 6:21 AM IST

नागपूर - सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या सरकारने महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवरून दूर केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. महायुती सत्तेत असताना राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. रोजगार निर्माण करण्याच्या बाबतीतही महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी ठरल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

मल्लिकार्जुन खरगे


महाराष्ट्र नेहमीच काँग्रेस करता महत्वाचे राज्य राहिले आहे. आघाडी सरकारने राज्याच्या प्रगतीकरता सर्वतोपरी प्रयत्न केले, म्हणूनच महाराष्ट्र अनेक बाबतीत सर्वात पुढे असायचा. मात्र, भाजप शिवसेना सरकारने महाराष्ट्राला २ पाऊले पुढे नेण्याऐवजी ४ पाऊले मागेच नेल्याचा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी राज्य सरकारने 5 वर्षात काय केले हे जनतेला ठाऊक आहे. तरुणांना रोजगार मिळण्याच्या बाबतीतही हे सरकार अपयशी ठरले आहे. तर, गुंतवणूक आणण्यातही अपयशच मिळाले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा - सावरकरांना भारतरत्न देण्याच्या भाजपच्या धोरणाला उदित रांज यांचा विरोध

प्रत्येक क्षेत्राचे खासगीकरण करण्यावर केंद्र सरकारचा जोर असल्याने हजारो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. भाजप सरकार केवळ मार्केटिंगच करण्यात पटाईत असून जनतेचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यात त्यांना काहीही रस नसल्याचा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांना निवडणूक शपथपत्र प्रकरणात न्यायालयाचा दिलासा

Last Updated : Oct 16, 2019, 6:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details