नागपूर :पुरवणी मागण्यांवरील ( winter session 2022 ) चर्चेदरम्यान आमदार भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी द्यावी या मागणीसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार हे सभागृहात अध्यक्ष यांना विनंती करीत होते. याच वेळी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील हे सुद्धा विधानसभा अध्यक्षांना भास्करराव यांना बोलण्याची संधी देण्याबाबत विनंती करीत होते. मात्र विधानसभा अध्यक्षांकडून त्याला प्रतिसाद दिला जात नव्हता. या संदर्भात बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरला.
जयंत पाटलांनी मागितली माफी -जयंत पाटील यांच्याकडून तोंडून अपशब्द निघाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी हा शब्द पकडून जयंत पाटील यांचा सभागृहात निषेध केला तसेच त्यांच्यावर कारवाईची जोरदार मागणी केली त्यामुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाल्यामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तर खूप करण्यात आले. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर जयंत पाटील यांनी सभागृहाची माफी मागितली मात्र मंत्री शंभूराज देसाई यांनी केवळ माफी मागून चालणार नाही अशा पद्धतीने अध्यक्षांचा अपमान होणार असेल तर कठोर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा ही प्रथा सुरू होईल त्यामुळे निलंबनाची मागणी करावी अशी विनंती केली.
उपसभापतींचे निर्देश तपासून कार्यवाही करणारशिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे ( Mp Rahul Shewale SIT Case ) यांच्या विरोधात एसआयटी चौकशीचे आदेश सभापती नीलम गोऱ्हे ( Deputy Speakers Instruction SIT Against Rahul Shewale ) यांनी दिले. सरकारकडून ठोस भूमिका स्पष्ट न झाल्याने विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण देताना, उपसभापतींचे निर्देश तपासून कार्यवाही करणार असल्याची ग्वाही दिली.