नागपूर- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवनेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांना मराठा आरक्षणावरून घेरण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या सभागृहात ललित ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा चांगलाच गाजला.
Live updates
- आदित्य ठाकरे देश सोडून जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करावी. त्यांचा पासपोर्ट जमा करावा, अशी आमदार नितेश राणी यांनी मागणी केली. युवा संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळत नसल्यानं रोहित पवार यांनी लाठीचार्ज करून घेतल्याची टीकाही राणे यांनी यावेळी केली.
- शिवाजी महाराज सुरतला गेले होते, म्हणून मी सुरता गेलो होतो, असे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी शिवसेना अपात्रता सुनावणीदरम्यान म्हटले. यावर विरोधकांनी नाराजी व्यक्ती केली आहे. गोगावले यांच वक्तव्य म्हणजे शिवाजी महाराजांबरोबर तुलना करण्यासारखं असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.
- धारावी पुनर्विकासाबाबत विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. धारावी वाचवा आणि लघू उद्योग वाचवा असे फलक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हातात घेतले आहे. लोकांना घर मिळतील की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धारावीतील लोकांना घरे मिळणार का प्रश्न दोन्ही घरांमध्ये उपस्थित करणार असल्याचे आमदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले. धारावी विकासाच्या नावाखाली गुंडगिरी सुरू असल्याचा गायकवाड यांनी गंभीर आरोप केला.
- सरकारमुळे मराठा आणि ओबीसीमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. आमच्या नेत्यांकडून वारंवरा जातीनिहाय जनगणनेची मागणी होत आहे. शेक्षणिक व्यवस्थेविरोधात भाजप प्रणित सरकार आहे. मराठा-ओबीसीमध्ये वादाची ठिणगी हे राज्य सरकारचं पाप आहे, अशा जळजळीत शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली. ते नागपूर विधानभवनातून माध्यमांशी बोलत आहेत.