मुंबई -विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल हाती आले आहेत. जवळपास १६० जागा महायुतीला तर १०० च्या आसपास जागा या आघाडीला मिळाल्या आहेत. या निकालावरुन आघाडीने कुठेतरी कमबॅक केल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे. तर विदर्भात आघाडीने भाजपच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे. आघाडीने विदर्भात २२ जागा मिळवल्या आहेत.
विदर्भात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या
भाजप - २७
शिवसेना - ४
काँग्रेस - १६
राष्ट्रवादी काँग्रेस - ६
इतर - ९
गेल्या महिन्याभरापासून चालू असलेला १४ व्या विधानसभेचा रणसंग्राम आज अखेर संपला आहे. भाजप शिवसेनेला लोकांनी जरी कौल दिला असला तरी आघाडीनेही मुंसडी मारली आहे. भाजप शिवसेनेच्या काही विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. विदर्भामध्ये साकोली मतदारसंघातून काँग्रेसचे नाना पटोले हे विजयी झाले. त्यांनी भाजपचे विद्यमान मंत्री परिणय फुके यांचा पराभव केला. विदर्भात युतीला ३० जागा मिळाल्या आहेत. तर आघाडीला २४ जागा मिळाल्या आहेत.
युती पुन्हा सत्तेत येणार की काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. विदर्भात नागपूर आणि अमरावती असे दोन प्रशासकीय विभाग आहेत. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होते. त्यामुळे विदर्भाला प्रशासकीयदृष्ट्या देखील महत्त्व आहे. सत्ता स्थापनेसाठी महत्वाचा विभाग म्हणून विदर्भाकडे पाहिले जाते. जो पक्ष विदर्भात बाजी मारेल त्याचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होणार आहे.
- रामटेक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आणि शिवसेना बंडखोर आशिष जयस्वाल यांचा विजय, भाजपच्या मल्लिकाअर्जुन रेड्डी यांचा पराभव
- उत्तर नागपूर : काँग्रेसचे नितीन राऊत विजयी, भाजपच्या मिलिंद मानेंचा पराभव
- तुमसर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राजीव कारे मोरे विजयी, अपक्ष चरण वाघमारेंचा पराभव
- चंद्रपुरातील राजूरा मतदारसंघातून काँग्रेसचे सुभाष धोटे २ हजार ७० मतांनी विजयी, भाजपचे संजय धोटे यांचा पराभव
- आरमोरी मतदारसंघातून भाजपचे कृष्णा गजबे विजयी, काँग्रेसचे आनंदराव गेडामांचा पराभव
- 4.00 - गोंदियातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून विद्यमान मंत्री राजकुमार बडोलेंचा पराभव, राष्ट्रवादीच्या मनोहक चंद्रिकापुरे यांनी केला पराभव
- 3.58 - हिंगणघाट मतदारसंघात भाजपच्या समीर कुणावार यांचा विजय, राष्ट्रवादीच्या राजू तिमांडेचा पराभव
- 3.57- आर्वी विधासभा मतदारसंघातून भाजपचे दादाराव केचे विजयी, काँग्रेसच्या अमर काळेंचा
- 3.55 - वर्धा जिल्ह्यातील देवळी मतदारसंघातून काँग्रसचे रणजित कांबळे विजयी, अपक्ष उमेदवार राजेश बकाणे यांचा पराभव
- 3.52 - पश्चिम नागपूर काँग्रेसचे विकास ठाकरे ६ हजार ४०० मतांनी विजयी, सुधाकर देशमुखांचा पराभव
- 3.51 - काटोल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख विजयी, तर भाजपचे चरणसिंग ठाकूरांचा पराभव
- 3.50 - चिमूर मतदारसंघातून भाजपचे बंटी भांगडीया यांचा विजय, काँग्रेसचे सतिश वारजूरकर यांचा पराभव
- 3.45 -ब्रम्हपुरी मतदारसंघातून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विजयी, संदीप गड्डमरवारांचा पराभव
- 3.40 - गडचिरोलीतून राष्ट्रवादीचे धर्मराव अत्राम विजयी; १५ हजार ४५८ मतांनी विजयी; अंबरिश अत्राम यांचा पराभव
- 3.30 - अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे आघाडीवर
- 3.20 - आमगाव मतदारसंघातून काँग्रेसचे सहसराम कारोटे आघाडीवर
- 3.15 -गोंदियातून अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल विजयी
- 3.00 - गोंदियातील तिरोडा मतदारसंघातून भाजपचे विजय रहांगडाले विजयी
- 2.00 -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३२ हजार मतांनी आघाडीवर
- 1.30 -साकोली मतदारसंघातून काँग्रेसचे नाना पटोले आघाडीवर तर परिणय फुके पिछाडीवर
- 1.15 - गोंदिया विधानसभेतून अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल,भाजपचे गोपालदास अग्रवाल पिछाडीवर
- 1.00 -ब्रम्हपुरी मतदारसंघातून विजय वडेट्टीवार १५ हजार ८०७ मतांनी पुढे, संदिप गड्डमवार पिछाडीवर
- 12.55 - चिमूर मतदारसंघ भाजपचे बंडी भांगडीया आघाडीवर
- 12.50- गडचिरोली मतदारसंघाचे उमेदवार भाजपचे देवराव होळी ८ हजार ७०० मतांनी आघाडीवर
- 12.45 - बल्लारपूरम मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार २७ हजार मतांनी आघाडीवर, काँग्रेसते विश्वास झाडे पिछाडीवर
- 12.30- रामटेकमधून अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल १८ हजार ७२६ मतांनी आघाडीवर आहेत.
- 12.25 - बल्लापूरमधून सुधीर मुनगंटीवार आघाडीवर
- 12.20- ब्रम्हपुरीमधून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आघाडीवर
- 12.00 - अचलपूर मतदारसंघातून प्रहारचे बच्चू कडू विजयी
- 11.15 - अपक्ष उमेदवरा विनोद अग्रवाल आघाडीवर, विद्यमान आमदार गोपालदास अग्रवाल पिछाडीवर
- 11.10- भंडारा अपक्ष उमेदवार नरेंद्र मोहंदकर आघाडीवर
- 11.00 -साकोली भाजपचे परिणय फुके आघाडीवर काँग्रेसचे नाना पटोले पिछाडीवर
- 10.25 -नागपूर-पश्चिम काँग्रेसचे विकास ठाकरे १७४ मतांनी आघाडीवर
- 10.15 -उत्तर नागपूरमधून काँग्रेसचे नितीन राऊत ६ हजार ६११ मतांनी आघाडीवर
- 10.05 -भंडारा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष नरेंद्र भोंडेकर आघाडीवर, तर भाजपचे अरविंद भालदरे, काँग्रेसचे जयदीप कवाडे पिछाडीवर
- 10.00 - सोकोलीतून नाना पटोले पिछाडीवर
- 9.50 -नागपुरात १२ पैकी ४ जागांवर काँग्रेस आघाडीवर
- 9.30-सावनेर मतदारसंघातून काँग्रेसचे सुनील केदार हे आघाडीवर आहेत.
- 9.15 - अचलपूर मतदारसंघातून प्रहारचे बच्चू कडू आघाडीवर
- 8.55 - अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे आघाडीवर
- 8.50 - कोटोलमधून राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आघाडीवर
- 8.50 -नागपूर पश्चिम-दक्षिण मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत
- 8.45- नागपूर विभागात महायुतीची 10 जागांवर आघाडी
- 8.40 - बडनेरा मतदारसंघातून आघाडीचे रवी राणा आघाडीवर
- 8.30 -नागपूरमध्ये मतमोजणीला सुरुवात
विदर्भच्या राजकारणावर कायम काँग्रेसचा वरचष्मा होता. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत विदर्भातील सर्व राजकीय समीकरणे बदलून गेली. काँग्रेसमधील अंतर्गत दुफळीचा फटका पक्षाला बसला, आणि त्याचा फायदा भाजपला झाला. भाजपने विदर्भात सध्या भक्कम पाय रोवले आहेत.
विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा आहेत. विदर्भात भाजपची मोठी ताकद असल्याचे २०१४ च्या निवडणुकीत स्पष्ट झाले होते. गेल्या निवडणुकीत चारही पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यावेळी भाजपला ६२ पैकी ४४ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे विदर्भात भाजपची मोठी ताकद असल्याचे पाहायला मिळाले. तर काँग्रेसला १०, शिवसेनेला ४, राष्ट्रवादी १ तर इतर ३ अशा जागा मिळाल्या होत्या.