नागपूर - मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आघाडीच्या विजयाने भाजपला खिंडार पाडले आहे. नुकतीच मतमोजणी पार पडलेली आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यामध्ये आघाडीने चांगल्याप्रकारे मुसंडी मारली आहे. आघाडीला ५ जागा, तर भाजपला ६ जागा मिळाल्या आहेत, तर अपक्ष उमेदवाराला एक जागा मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फक्त ४५ हजार मतांनी विजय झाला आहे. त्यांना काँग्रेसच्या आशिष देशमुख यांनी चांगल्या प्रकारे टक्कर दिली आहे.
विजयी उमेदवार -
- दक्षिण -पश्चिम मतदारसंघ - भाजप - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- नागपूर पूर्व - भाजप- कृष्णा खोपडे
- मध्य नागपूर - भाजप - विकास कुंभारे
- नागपूर दक्षिण - भाजप - मोहन मते
- हिंगणा - भाजप - समीर मेघे
- कामठी - भाजप - टेकचंद सावरकर
- उत्तर नागपूर - काँग्रेस - नितीन राऊत
- नागपूर पश्चिम - काँग्रेस - विकास ठाकरे
- उमरेड - काँग्रेस - राजू पारवे
- काटोल - राष्ट्रवादी - अनिल देशमुख
- सावनेर - काँग्रेस - सुनिल केदार
- रामटेक - अपक्ष - आशिष जयस्वाल
दिवसभरातील घडामोडी :
सा. ५.२२ : जिल्हा : नागपुरात आघाडीचा ५ जागांवर विजय, भाजप ४, तर अपक्ष एका जागेवर विजयी, कामठीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर
सा. ५.२१ : सावनेर :काँग्रेसचे सुनिल केदार विजयी, भाजपच्या विजय पोतदारांचा पराभव
सा. ५.२० : मध्य नागपूर :भाजपचे विकास कुंभारे विजयी ३ हजार ७४१ मतांनी विजयी, काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा पराभव
सा. ५.१९ : हिंगणा : भाजपचे समीर मेघे विजयी, राष्ट्रवादीच्या विजय घोडमारेंचा पराभव
सा. ५.१७ : दक्षिण-पश्चिम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विजयी, काँग्रेसच्या आशिष देशमुखांचा पराभव
दु. ४.४४ : उमरेड : काँग्रेसचे राजू पारवे विजयी, भाजपच्या सुधीर पारवेंचा पराभव
दु. ४.४० : उत्तर नागपूर : काँग्रेसचे नितीन राऊत विजयी, भाजपच्या मिलिंद मानेंचा पराभव
दु. ४.३७ : रामटेक :अपक्ष उमेदवार आणि शिवसेना बंडखोर आशिष जयस्वाल यांचा २३ हजार ७७९ मतांनी विजय, भाजपच्या मल्लिकाअर्जुन रेड्डी यांचा पराभव
दु. ४.१९ : पूर्व नागपूर :भाजपचे कृष्णा खोपडे २३ हजार ९३० मतांनी विजयी, काँग्रेसच्या पुरुषोत्तम हजारेंचा केला पराभव
दु. ३.३५ : दक्षिण नागपूर : भाजपचे मोहन मते आघाडीवर
दु. ३.२४ : काटोल : राष्ट्रवादीचे अनिल देशमुख १६ हजार १ मतांनी विजयी
दु. ३.०५ : दक्षिण नागपूर :काँग्रेसचे गिरीश पांडव आघाडीवर, भाजपचे मोहन मते पिछाडीवर
दु. २.५१ : सावनेर : काँग्रेसचे सुनिल केदार १० हजार २८७ मतांनी आघाडीवर
दु. २.४९ : उमरेड : काँग्रेसचे राजू पारवे ५ हजार ७६९ मतांनी आघाडीवर
दु. २.२७ : काटोल : अनिल देशमुख १५ हजार ८९१ मतांनी आघाडीवर, चरणसिंह ठाकूर पिछाडीवर
दु. २.४७ : कामठी :काँग्रेसचे सुरेश भोयर १७०० मतांनी आघाडीवर
दु. २.४० : दक्षिण-पश्चिम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३२ हजार मतांनी आघाडीवर
दु. २.०६ : पश्चिम नागपूर :काँग्रेसचे विकास ठाकरे ६ हजार ४०० मतांनी विजयी, भाजपच्या सुधाकर देशमुखांचा पराभव
दु. १.५९ : मध्य नागपूर: भाजपचे विकास कुंभारे ६ हजार ३०० मतांनी आघाडीवर
दु. १.५८ : दक्षिण-पश्चिम :भाजपचे देवेंद्र फडणवीस २० हजार ८८५ मतांनी आघाडीवर
दु. १.५७ : उत्तर नागपूर : काँग्रेसचे नितीन राऊत १६ हजार मतांनी आघाडीवर
दु. १.५७ : दक्षिण नागपूर: भाजपचे मोहन मते ५ हजार ८३७ मतांनी आघाडीवर
दु. १.५६ : पश्चिम नागपूर: काँग्रेसचे विकास ठाकरे ७ हजार ८३७ मतांनी आघाडीवर
दु. १.५६ : पूर्व नागपूर: भाजपचे कृष्णा खोपडे २० हजार मतांनी आघाडीवर
दु. १.४४ : कामठी :काँग्रेसचे सुरेश भोयर १ हजार ६१३ मतांनी आघाडीवर
दु. १.४३ : काटोल - राष्ट्रवादीचे अनिल देशमुख १५ हजार ९८७ मतांनी आघाडीवर
दु. १.२९ : हिंगणा :भाजपचे समीर मेघे १४ हजार ७८० मतांनी आघाडीवर
दु. १.२८ : उमरेड : काँग्रेसचे राजू पारवे ४५०० मतांनी आघाडीवर, सुधीर पारवे पिछाडीवर
दु. १.२३ : मध्य नागपूर :भाजपचे विकास कुंभारे ३०२५ मतांनी आघाडी
दु.१.२२ : काटोल : राष्ट्रवादीचे अनिल देशमुख १४ हजार मतांनी आघाडीवर, तर भाजपचे चरणसिंह ठाकूर पिछाडीवर
दु. १.२१ : नागपूर-पश्चिम :काँग्रेसच्या विकास ठाकरेंची ८ हजार ११८ मतांनी आघाडीवर
दु. १.०६ : रामटेक : अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल १८ हजार ७२६ मतांनी आघाडी
दु. १.०५ : कामठी : काँग्रेसचे सुरेश भोयर यांची २ हजार ३०० मतांनी आघाडी
दु. १.०४ : हिंगणा : भाजपचे समीर मेघे १० हजार ५७ मतांनी आघाडीवर
दु. १.०३ : दक्षिण नागपूर : भाजपचे मोहन मते ११ हजार ५७ मतांनी आघाडीवर
दु.१.०३ : मध्य नागपूर :भाजपचे विकास कुंभारे ७ हजार,२५८ मतांनी आघाडीवर
दु. १.०० : उत्तर नागपूर :काँग्रेसचे नितीन राऊत १६ हजार ४९४ मतांनी आघाडीवर
दु..१२.५९ : नागपूर पश्चिम: काँग्रेसचे विकास ठाकरे ९ हजार ७९७ मतांनी आघाडीवर
दु. १२.५९ : दक्षिण पश्चिम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १९ हजार ३७६ मतांनी आघाडीवर
दु. १२.५१ : दक्षिण नागपूर :भाजपचे मोहन मते ६ हजार ६७५ आघाडीवर
दु. १२.४९ : मध्य नागपूर : काँग्रेसचे बंटी शेळके आघाडीवर, तर विकास कुंभारे पिछाडीवर
दु. १२.४३ : काटोल : राष्ट्रवादीचे अनिल देशमुख १२ हजार ९५६ मतांनी आघाडीवर
दु. १२.४१ : कामठी : काँग्रेस सुरेश भोयर १ हजार ५६७ मतांनी आघाडी
दु. १२.४० : मध्य नागपूर : भाजपचे विकास कुंभारे ११ हजार ६३२ मतांनी आघाडीवर
दु. १२.४० : उमरेड : काँग्रेसचे राजू पारवे ६ हजार मतांनी आघाडीवर
दु. १२.३६ : रामटेक : अपक्ष आशिष जयस्वाल १७ हजार ४५४ मतांनी आघाडीवर
दु. १२.३० : कामठी :काँग्रेसचे सुरेश भोयर २ हजार १९९ मतांनी आघाडीवर, तर टेकचंद सावरकर पिछाडीवर
दु. १२.२९ : हिंगणा : भाजपचे समीर मेघे १० मतांनी आघाडीवर
दु. १२.२१ : पूर्व नागपूर :भाजपचे कृष्णा खोपडे १६ हजार २९० मतांनी आघाडीवर
दु. १२.१० : हिंगणा :भाजपचे समीर मेघे ५ हजार ३२५ मतांनी आघाडीवर
दु. १२.०९ : काटोल : राष्ट्रवादीचे अनिल देशमुख ९ हजार १६५ मतांनी आघाडीवर
दु.१२.०८ : सावनेर : काँग्रेसचे सुनिल केदार ४ हजार ७४७ आघाडीवर
दु. १२.०७ : रामटेक :अपक्ष आशिष जयस्वाल १३ हजार ३७४ मतांनी आघाडीवर
दु. १२.०६ : उमरेड :भाजपचे सुधीर पारवे यांची १ हजार ३५४ मतांनी आघाडी
दु. १२.०५ : हिंगणा :भाजपचे समीर मेघे ८ हजार मतांनी आघाडीवर
दु. १२.०३ : कामठी : काँग्रेसचे सुरेश भोयर २००० मतांनी आघाडीवर