महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात दीक्षाभूमीवर भीम अनुयायांची गर्दी, महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरांना वाहिली श्रद्धांजली

बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी मुंबई येथील चैत्यभूमीप्रमाणेच नागपुरातील दीक्षाभूमीचे महत्त्व फार मोठे आहे. बाबासाहेबांनी नागपुरच्या दीक्षा भूमीवरच बौद्ध धर्माची दीक्षा स्वीकार केली होती.

By

Published : Dec 6, 2019, 12:59 PM IST

नागपुरात दीक्षाभूमीवर भीम अनुयायांची गर्दी
नागपुरात दीक्षाभूमीवर भीम अनुयायांची गर्दी

नागपूर- संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमी येथे हजारो अनुयायी उपस्थित झाले आहेत. याठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी मुंबई येथील चैत्यभूमीप्रमाणेच नागपुरातील दीक्षाभूमीचे महत्त्व फार मोठे आहे. बाबासाहेबांनी नागपुरच्या दीक्षा भूमीवरच बौद्ध धर्माची दीक्षा स्वीकार केली होती.

नागपुरात दीक्षाभूमीवर भीम अनुयायांची गर्दी

आज बाबासाहेबांचा 63 वा महापरिनिर्वाण दिन असल्याने हजारो अनुयायी मुंबईत दाखल झाले आहेत. तर, ज्या अनुयायांना मुंबईला जाणे शक्य होत नाही, अशा हजारो जणांनी दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details