महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिशा सालियान प्रमाणे जस्टिस लोया यांच्या मृत्यूचीही चौकशी एसआयटीमार्फत करा - अंबादास दानवे - Disha Salian

Judge Loya Death : दिशा सालियान मृत्यू प्रकरण्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. यानंतर आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, जस्टिस लोया यांच्या मृत्यूची चौकशीही एसआयटीमार्फत करण्याची मागणी केली.

Ambadas Danve
Ambadas Danve

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2023, 7:26 PM IST

नागपूर Judge Loya Death : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी, विशेष सीबीआय न्यायाधीश बी एच लोया यांच्या मृत्यूची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची मागणी केली. "सरकारला दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी एसआयटीमार्फत करायची असेल तर लोया यांच्या मृत्यूची चौकशीही एसआयटीमार्फत करा", असं दानवे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस एसआयटी चोकशीबाबत बोलले होते : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन (२८) हिनं ८ जून २०२० रोजी मुंबईतील एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. तर जस्टिस लोया यांचा १ डिसेंबर २०१४ रोजी नागपुरात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. ते संवेदनशील सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी करत होते. "दिशा सालियन हिच्या मृत्यूच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येईल," असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात म्हणाले होते.

दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप : भाजपाच्या काही नेत्यांनी, दिशा सालियन खून प्रकरणात शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांना ओढण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर तसंच आमदार प्रसाद लाड यांनी दिशा सालियान प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. "एसआयटी सर्व शंका दूर करेल", असं प्रसाद लाड म्हणाले आहेत. मात्र सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत का, असं विचारलं असता उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विधानभवनाच्या आवारात पत्रकारांना सांगितलं की, त्यांच्याकडे अशा आदेशाबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.

दानवेंचा राजकारण सुरू असल्याचा आरोप : सालियनच्या प्रकरणातील एसआयटी तपासाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अंबादास दानवे म्हणाले की, गेल्या वर्षीही ही घोषणा करण्यात आली होती. आतापर्यंत अनेक तपास केले गेले. मी मागणी करतो की न्यायाधीश लोया यांच्या प्रकरणाचीही एसआयटी चौकशी सुरू करावी. "दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी करायची असेल तर तुम्ही करू शकता. मात्र या सगळ्यावर राजकारण केलं जात आहे. न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूचीही सरकारनं चौकशी करावी," असं दानवे म्हणाले.

हे वाचलंत का :

  1. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक बॅकफूटवर, सत्ताधाऱ्यांची 'ही' खेळी चर्चेत
  2. दिशा सालियन मृत्यू प्रकरण; एसआयटी स्थापन, राजीव जैन यांच्या अध्यक्षतेखाली होणार तपास

ABOUT THE AUTHOR

...view details