नागपूर- जिल्ह्यातील नरखेड जवळ रामेश्वरम ते मंडूवाडी दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये महिलेने एक गोंडस बाळाला जन्म दिला आहे. पुनमदेवी विश्वकर्मा ही महिला सासरे मरण पावल्यामुळे चेन्नई वरून उत्तरप्रदेशातील मूळ गावाला जात होती. त्या दरम्यान ट्रेनमध्येच महिलेची प्रसूती पार पाडली.
धावत्या रेल्वेत महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म; नरखेड जवळील प्रकार - ट्रेन
जिल्ह्यातील नरखेड जवळ रामेश्वरम ते मंडूवाडी दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये महिलेने एक गोंडस बाळाला जन्म दिला आहे. पुनमदेवी विश्वकर्मा ही महिला सासरे मरण पावल्यामुळे चेन्नई वरून उत्तरप्रदेशातील मूळ गावाला जात होती. त्या दरम्यान ट्रेनमध्येच महिलेची प्रसूती पार पाडली.
दरम्यान, नागपूर रेल्वे स्थानकावरून गाडी सुटल्यानंतर महिलेच्या पोटात कळा येणे सुरु झाल्या. पण नागपूर नंतर ट्रेनला थेट इटारसी पर्यंत थांबा नसल्यामुळे काळजीत अधिकच भर पडली. ट्रेनमध्ये कुणी डॉक्टर आहेत काय याचा शोध सुरू झाला. मात्र, ट्रेनमध्ये कुणीच डॉक्टर नव्हते. अशात ट्रेनमधील काही महिला प्रवाशी महिलेच्या मदतीसाठी पुढे आल्या. त्यांनी धावत्या ट्रेनमध्येच महिलेची प्रसूती पार पाडली. घटनेची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आली. नरखेड रेल्वे स्थानकावर थांबा नसताना देखील मेडिकल आपतकाल म्हणून ट्रेन थांबविली गेली. आई आणि बाळाला नरखेडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दोघांची प्रकृती स्थिर आहे.