महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कन्हान नदी धोक्याच्या पातळीवर; नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरु असल्यामुळे पेंच धरणाची पाणी पातळी वाढलीय. कन्हान नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. पेंच प्रकल्प प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिली आहे. पूर परिस्थितीमुळे नागरिक अन्नधान्य व आवश्यक वस्तू सुरक्षित स्थळी ठेवत आहेत.

kanhan river flood
कन्हान नदी धोक्याच्या पातळीवर

By

Published : Aug 29, 2020, 3:25 PM IST

नागपूर- जिल्ह्यात दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहे. पावसामुळे पेंच धारणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाणी पातळी वाढल्याने धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे कन्हान नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. नदी दुथडी भरुन वाहत असल्याने नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कन्हान नदी धोक्याच्या पातळीवर

पेंच धरण भरल्याने धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग देखील वाढला आहे. धरणाचे दरवाजे उघडल्याने कन्हान, सांड आणि सूर नदीला पूर आला आहे. शहरालगतच्या भागात कन्हान नदीची पाणी पातळी वाढल्याने पूर स्थिती निर्माण झाली आहे.

मौदा, सावनेर तालुक्यातील काही गावांमध्ये शिरले आहे याचा फटका अनेक गावांना बसलाय.नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचे पाहून नागरिक अन्नधान्य व इतर वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवत आहेत. पेंच धरणाचे दरवाजे ५ मीटर ने उघडण्यात आले आहे. त्यामुळे पेंच प्रकल्प प्रशासनाकडून लगतच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. जिल्ह्यात इतर भागातही जोरदार पाऊस झाल्याने सर्वदूर पाऊस सुरु आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details