नागपूर :भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच (NHAI) मध्ये अवघ्या 10 हजार रुपयांची गुंतवणूक करून सरकारचे व्यवसाय भागीदार होण्याची संधी सर्वसामान्यांना उपलब्ध झाली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण इनवीटच्या माध्यमातून NCDs म्हणजेच नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर जारी ( Non Convertible Debentures ) करेल. त्याचे ट्रेडिंग फक्त BSE आणि NSE वर केले जाईल या बद्दल केंद्रिय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांनी आनंद व्यक्त केला आहे. अवघ्या 10 हजार रुपयांची गुंतवणूक करून सरकारचे व्यवसाय भागीदार व्हा असे आवाहन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केले आहे
गुंतवणुकीची संधी :देशातील सामान्य नागरिकांना पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात गुंतवणुकीची संधी देण्यासाठी ( Investment opportunity in infrastructure sector ) सरकारने InvIT NCD आणले आहेत. यामध्ये 25 टक्के एनसीडी (नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर) रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
एनएचआयमध्ये अवघ्या 10 हजार रुपयांची गुंतवणूक; सरकारचे व्यवसाय भागीदार होण्याची संधी
नितीन गडकरी यांचे ट्विट : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक ट्विट केलं आहे,ज्यामध्ये ते म्हणता की आज एक ऐतिहासिक दिवस आहे आणि मला खूप आनंद होत आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या InvIT NCDs मध्ये, तुम्हाला बँकांपेक्षा 8.05 टक्क्यांपर्यंत जास्त परतावा मिळतो. किरकोळ गुंतवणूकदारांना निवृत्त नागरिक,पगारदार व्यक्ती,लहान आणि मध्यम व्यावसायिक मालक यांना राष्ट्र-निर्माण कार्यात सहभागी होण्याची संधी देऊ शकलो. किमान गुंतवणूक स्लॅब फक्त दहा हजार रुपये इतका निर्धारित करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
InvIT बाँड्स प्रधानमंत्री मोदींची संकल्पना :InvIT बाँड्स ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची आत्मनिर्भर भारतची संकल्पना ( PM Modi Amtnirbhar bharat concept ) साकारण्याची एक उत्तम संधी आहे. आपल्या देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे, विशेषतः रस्ते महत्त्वपूर्ण आहेत आणि मला विश्वास आहे की आणखी किरकोळ गुंतवणूकदार पुढील फेरीत भाग घेतील आणि हळूहळू संस्थात्मक गुंतवणूकदारांना मागे टाकतील असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.