नागपूर - वीज दरवाढीचा भार सामान्य नागरिकांवर पडू देणार नाही, असे आश्नासन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहे. राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. वीज नियामक मंडळाने वीज दरवाढ प्रस्तावित केली आहे, यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
'वीज दरवाढीचा परिणाम सामान्य नागरिकांवर पडणार नाही' - dr nitin raut nagpur
महावितरणने वीज दर वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. नियामक आयोगाने त्यासंदर्भात फेब्रुवारी महिन्यात जनसुनावणी ठेवली आहे. त्यानंतर वीज नियामक आयोग काय निर्णय घेते? हे पाहणे महत्वाचे असल्याचे देखील ऊर्जामंत्री म्हणाले आहेत. वीजदरवाढ झाल्यास ग्राहकांवर वाढीव वीज दराचा भार पडणार नाही, असा सरकारचा प्रयत्न राहील असेही ते म्हणाले.
महावितरणने वीज दर वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. नियामक आयोगाने त्यासंदर्भात फेब्रुवारी महिन्यात जनसुनावणी ठेवली आहे. त्यानंतर वीज नियामक आयोग काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे असल्याचे देखील ऊर्जामंत्री म्हणाले. वीजदरवाढ झाल्यास ग्राहकांवर वाढीव वीज दराचा भार पडणार नाही, असा सरकारचा प्रयत्न राहील असेही ते म्हणाले. वीज दरवाढीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यात आवश्यक निर्देश देणार आहेत. वीज दरवाढीचा निर्णय पूर्णपणे वीज नियामक आयोगाचा आहे. मात्र, त्याचा भार सामान्य नागरिकांवर पडणार नाही, याची काळजी घेण्यात येणार असल्याचेही राऊत म्हणाले आहेत.
हेही वाचा -'योग्य वेळी राज्याची सत्ता हातात, शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभं करणार'