महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'घेऊन जा गे मारबsssssत', नागपुरात मारबत उत्सवाची तयारी पूर्ण, 'हे' आहे काळ्या, पिवळ्या मारबतींचे महत्त्व - पिवळ्या मारबतीचे महत्त्व -

देशात फक्त नागपुरात हा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये काळी आणि पिवळी अशा दोन प्रकारच्या मारबतींची मिरवणूक काढण्यात येते. काळ्या मारबतीला १३८ वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३४ वर्षांचा इतिहास लाभला आहे. या काळ्या, पिवळ्या मारबतींचे महत्त्व काय आहे? हे जाणून घेऊया 'या' स्पेशल रिपोर्टमधून...

काळी,पिवळी मारबत

By

Published : Aug 30, 2019, 8:47 AM IST

Updated : Aug 30, 2019, 3:07 PM IST

नागपूर -नागपूर लाभलेल्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा म्हणजेच मारबत उत्सव होय. या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. समाजातील अनिष्ट रुढी-परंपरांचे उच्चाटन करण्यासाठी काळ्या-पिवळ्या मारबतीची मिरवणूक येत्या १ सप्टेंबरला निघणार आहे.

'घेऊन जा गे मारबsssssत', 'हे' आहे काळ्या, पिवळ्या मारबतींचे महत्त्व, बघा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट...

देशात फक्त नागपुरात हा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये काळी आणि पिवळी अशा दोन प्रकारच्या मारबतींची मिरवणूक काढण्यात येते. काळ्या मारबतीला १३८ वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३४ वर्षांचा इतिहास लाभला आहे.

काळ्या मारबतीचे महत्त्व -
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजाची सत्ता होती. त्यांच्या जुलुमी कारवायांमुळे जनता त्रस्त होती. त्यावेळी भोसले घराण्यातील बकाबाईने इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच अनेक मानव जातीसाठी घातक असलेल्या अनेक रुढी परंपरांचे उच्चाटन करणे. वाईट परंपरा, रोगराई, संकटांतून समाजाला मुक्त करण्यासाठी १८८१ पासून ही काळी मारबत काढण्यात येत आहे. इंग्रजांना संशय येऊ नये यासाठी या काळ्या मारबतीला महाभारताचा संदर्भ दिला जातो. कृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतणा मावशीचे प्रतीक म्हणजे काळी मारबत समजले जाते. सर्वप्रथम अप्पाजी मराठे यांनी काळ्या मारबतीचा उत्सव साजरा केला. श्री देवस्थान पंच कमेटीतर्फे गेल्या १३८ वर्षांपासून इतवारीस्थित नेहरू पुतळ्यापासून काळ्या मारबतीची मिरवणूक काढली जाते.

हे वाचलं का? - नंदुरबार : पोळ्यानिमित्त बाजारपेठा सजल्या, सरजा-राजाला सजवण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

पिवळ्या मारबतीचे महत्त्व -
ब्रिटिश राजवटीत जनता ब्रिटिशांच्या अत्याचाराने त्रस्त होती. त्यावेळी देश गुलामगिरीतून मुक्त व्हावा, या भावनेने १८८५ मध्ये तेली समाजबांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. तेव्हापासून पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्ह्या पोळ्याच्या दिवशी काळ्या आणि पिवळ्या दोन्ही मारबतींची मिरवणूक एकाचवेळी काढली जाते. चांगल्या गोष्टींचे स्वागत करण्यासाठी पिवळी मारबत काढली जाते. लोकांचे रक्षण करणारी मूर्ती म्हणजेच पिवळी मारबत असते.

हे वाचलं का?- धुळ्यात बैलपोळ्यानिमित्त बाजारपेठा सजल्या; लाखो रुपयांची उलाढाल

देशातील घडामोडींवर भाष्य करणारे बडगे -
काळ्या-पिवळ्या मारबतीसोबत बडगे देखील काढले जातात. यामध्यमातून देशातील चांगल्या-वाईट घडामोडींवर बडगे तयार केले जातात. तसेच सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर टीका केली जाते. त्यामुळे यंदा तिहेरी तलाक, कलम 370 सह अनेक मुद्दे बडग्याचे आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?- मारबतच्या आशयावरील बकाल चित्रपटाचं संगीत अनावरण

मारबत उत्सवावरील 'बकाल' चित्रपट -
देशात फक्त नागपुरात मारबत उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे संपूर्ण देशाला या उत्सवाबाबत माहिती व्हावी. तसेच ही परंपरा कायम राहावी, यासाठी राज्य सरकारने या उत्सवाची दखल घेतली आहे. त्यासाठी मारबत उत्सवावर बकाल चित्रपट येणार आहे. यामधील 'घेऊन जा गे मारबsssssत' हे गाणं नुकतचं रिलीज करण्यात आले.

Last Updated : Aug 30, 2019, 3:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details