महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बनावट ओळखपत्राद्वारे १३१ रेल्वे तिकीटांची विक्री; ४ आरोपी अटकेत

या कारवाईमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आला आहे. त्यामुळे काळाबाजार करणाऱ्यांमध्ये धडकी भरली असून काही दलाल भूमिगत झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ३ आरोपी हे कामठी मधील असून  १ आरोपी पारशिवणी येथील आहे.

नागपूर रेल्वे सुरक्षा बलाच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेले आरोपी

By

Published : May 4, 2019, 9:56 AM IST

नागपूर -रेल्वे सुरक्षा बलाच्या गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावर धाड टाकून व चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या वेगवेगळ्या केंद्राची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे ४२ बनावट ओळखपत्रे, ऑनलाइन व ऑफलाईन असे दोन लाख ३७ हजार रुपये किमतीचे १३१ रेल्वे तिकीट जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई गुरुवारी कामठी मार्गावरील लुंबिनी नगर येथे करण्यात आली आहे.

पोलीस अधिकारी कारवाईविषयी सांगताना

या कारवाईमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आला आहे. त्यामुळे काळाबाजार करणाऱ्यांमध्ये धडकी भरली असून काही दलाल भूमिगत झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ३ आरोपी हे कामठी मधील असून १ आरोपी पारशिवणी येथील आहे. विशेष म्हणजे उन्हाळाच्या सुट्ट्या असल्याने प्रवाशांची या दिवसात प्रचंड गर्दी असते. त्यामुळे तिकीटांचा काळा व्यवसाय येथून सुरू होतो. प्रवाशांकडून रेल्वे तिकीटामध्ये अधिक पैसे आकारून तिकीटची विक्री करन्यात येते.

आरोपी विजय टेम्बुरने हा लुम्बीनी या परिसरातून अवैध तिकीट विक्री करीत होता. विशेष म्हणजे त्याच्याकडे आयआरटीसी परवाना नसताना सुद्धा तो तिकीट काढून द्यायचा. यामुळे प्रवासी तिकिट काढून घेण्यासाठी त्याच्याकडे येत होते. आयटी विभागाला याबाबत माहिती मिळाली व त्यांना वरिष्ठांनी सूचना दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या संपूर्ण कारवाई मध्ये ४ आरोपींकडून २ लाख ७५ हजार रुपये किमतीचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details