नागपूर - शहरात अवैधरीत्या उभारण्यात आलेले जनावरांचे गोठे आता हटवले जाणार आहेत. शहरातील वर्दळीच्या व निवासी भागांमधील जनावरांच्या गोठ्यांमुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची बाब लक्षात घेऊन गोठ्यांसाठी स्वतंत्र झोन निर्माण करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. शहरात दोन हजारापेक्षा जास्त गोठे आहेत. यापैकी बरेचशे गोठे अवैधरित्या सुरू आहेत.
नागपुरातील जनावरांचे अवैध गोठे हटणार; स्मार्ट शहरासाठी महापालिकेचा निर्णय - smart city
शहरातील वर्दळीच्या व निवासी भागांमधील जनावरांच्या गोठ्यांमुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची बाब लक्षात घेऊन गोठ्यांसाठी स्वतंत्र झोन निर्माण करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. जनावरांसाठी निवारे उभारण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन केले आहे. ४६०० जनावरांसाठी एकूण 460 गोठे बांधण्यात येणार आहेत.
जनावरांच्या या गोठ्यांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे नंदग्राम प्रकल्पाअंतर्गत शहरातील गोठे हटवले जाणार आहेत. या योजनेतून शहरातील ४६०० जनावरे शहराबाहेर स्थलांतरित केली जाणार आहेत. यासाठी गोरेवाडा परिसरात जागा आरक्षित करण्यात आली आहे. जनावरांसाठी निवारे उभारण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन केले आहे. ४६०० जनावरांसाठी एकूण ४६० गोठे बांधण्यात येणार आहेत.
पावसाळ्यात मोकाट जनावरे आणि अवैध गोठ्यांमुळे अनेक समस्या उद्भवतात. शहरातील गोठ्यांची पाहणी करण्याचे निदेर्श आयुक्तांनी नगररचना आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. पूर्वी जनावरांचे हे गोठे शहराबाहेर होते. परंतु, शहराचा विस्तार झपाट्याने झाल्याने आता हेच गोठे मध्यवस्तीत आले आहेत.