नागपूर - अयोध्येतील भव्य राम मंदिरचे निर्माण व्हावे, या दिशेने काम चालू आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार राम मंदिर बांधण्यासाठी लवकरच काम सुरू होईल, असा विश्वास अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केला आहे. मात्र, या मंदिर निर्माणाच्या बांधकाम समितीचा ते भाग होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. रविशंकर हे खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी शहरात आले होते.
राम मंदिर निर्माण समितीत मी सहभागी नाही - श्री श्री रविशंकर - राम मंदिर निर्माण समिती श्री श्री रविशंकर
अयोध्येत राम मंदिराचे निर्माण व्हायला हवे. तसेच दोन्ही समाजात बंधुता निर्माण व्हावी ही सर्वांची इच्छा आहे. यासाठी मंदिराचे काम लवकरच सुरू होईल. मात्र, राम मंदिर बांधणी समितीचा भाग मी राहणार नाही, असे अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी स्पष्ट केले.
श्री श्री रविशंकर
यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना सांगितले, अयोध्येत राम मंदिराचे निर्माण व्हायला हवे. तसेच दोन्ही समाजात बंधुता निर्माण व्हावी ही सर्वांची इच्छा आहे. यासाठी मंदिराचे काम लवकरच सुरू होईल. मात्र, राम मंदिर बांधणी समितीचा भाग मी राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - ऐतिहासिक 'अयोध्या' निकालानंतर धर्मनिरपेक्षतेचा बोलबाला...