महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर जिल्ह्यातील 13 गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण - nagpur corona news

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेंतर्गंत पहिल्या टप्प्यात 45 वयोगटापेक्षा जास्त नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेंतर्गंत गावनिहाय पथके तयार करण्यात आली असल्यामुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नागपूर
नागपूर

By

Published : Jun 14, 2021, 1:19 PM IST

नागपूर-कोविड 1 च्या लसीकरण मोहिमेंतर्गंत नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिणामी 13 गावांमध्ये शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली.

13 गावांमध्ये लसीकरण पूर्ण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेंतर्गंत पहिल्या टप्प्यात 45 वयोगटापेक्षा जास्त नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेंतर्गंत गावनिहाय पथके तयार करण्यात आली असल्यामुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शंभर टक्के लसीकरण पूर्ण झालेल्या 13 गावांमध्ये हिंगणा तालुक्यातील देवळी (पेठ) व टाकळघाट या दोन गावांचा समावेश आहे. कळमेश्वर तालुक्यातील दहेगाव, काटोल तालुक्यातील गोंडीखापा, खापा, घुबडी, कावडीमेट, मोहगाव (ढोले) या पाच गावांचा समावेश आहे. कुही तालुक्यातील तारणी व पवनी ही दोन गावे, नरखेड तालुक्यातील परसोडी दीक्षित व रानवाडी अशी दोन गावे तर सावनेर तालुक्यातील सावळी (मोहतकर) या गावांचा समावेश असल्याची माहिती श्री. कुंभेजकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details