महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारावीचा निकाल जाहीर, नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल - निकाल

नागपूर विभागीय शिक्षण मंडळ नागपूरच्या अंतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपुर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. या साहाही जिल्ह्यांत २१ फेब्रुवारी ते 20 मार्च दर्म्यान बारावीची परिक्षा घेण्यात आली होती.

बारावीचा निकाल जाहीर

By

Published : May 28, 2019, 3:01 PM IST

Updated : May 28, 2019, 4:05 PM IST

नागपूर- महाराष्ट्रराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या १२ वी चा निकाल जाहीर झाला असून यात कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर जिल्ह्याचा लागला आहे. नागपूर विभागाची टक्केवारी पाच टक्क्यांनी घसरली असून नागपूर विभागाचा निकाल ८२.५१ टक्के लागला आहे.

नागपूर विभागीय शिक्षण मंडळ नागपूरच्या अंतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपुर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. या साहाही जिल्ह्यांत २१ फेब्रुवारी ते 20 मार्च दर्म्यान बारावीची परिक्षा घेण्यात आली होती. ४७१ केंद्रावर ही परीक्षा घेतल्या गेली. यामध्ये १५८४२७ पैकी १५८३१९ विद्यार्थी पास झालेत. यात ८७.८४ टक्यांसह गडचिरोली जिल्ह्याने बाजी मारली आहे.

९ विभागात एकून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते तर त्यापैकी १२ लाख २१ हजार विद्यार्थी या परिक्षेत पास झालीत. निकालाची टक्केवारी ८५.८८ टक्के असून यात मुलांचा निकाल ८२.४० टक्के असून मुलींचा निकाल सर्वात जास्त ९०.२५ टक्के इतका आहे. नेहमी प्रमाणे यंदाही मुलींनी १२ वी च्या निकालात बाजी मारली आहे.

नागपूर विभागातील जिल्हे व विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी पुढील प्रमाणे आहे.

नागपूर- ८४.३२
भंडारा - ८४.५३
चंद्रपूर- ८०.८९
नागपूर- ८४.३२
वर्धा - ८०.५२
गडचिरोली- ६८.८०
गोंदिया - ८७.९९

९ विभागात एकून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते तर त्यापैकी १२ लाख २१ हजार विद्यार्थी या परिक्षेत पास झालीत. निकालाची टक्केवारी ८५.८८ टक्के असून यात मुलांचा निकाल ८२.४० टक्के असून मुलींचा निकाल सर्वात जास्त ९०.२५ टक्के इतका आहे. नेहमी प्रमाणे यंदाही मुलींनी १२ वी च्या निकालात बाजी मारली आहे.

Last Updated : May 28, 2019, 4:05 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details