नागपूर: थॅलेसेमियाच्या रुग्णांना ( Thalassemia patients ) नियमित रक्त द्यावे लागते, त्यांच्या शरीरात रक्त तयार होत नसल्याने त्यांचं आयुष्य हे बाहेरच्या रक्तदात्यांवर अवलंबून असते. पण थॅलेसेमिया रुग्णांना रक्त देताना इतर विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण नागपुरात दूषित रक्त दिल्यामुळे चार लहान बालकांना एचआयव्हीचे संक्रमण झाल्याचे समोर ( HIV infection in the blood ) आले आहे. यासाठी रक्त देताना डोनर आणि रक्त संकलन केंद्राची काय एसओपी असते, तसेच त्यातील तांत्रिक बाबी ज्यामध्ये चाचणी केलेले ब्लड का दूषित ठरले, ते ही जाणून घेऊ....
रक्तदात्यांकडून मिळालेल्या ब्लडवर नियमित पद्धतीने ब्लड बँकेत चाचण्या केल्या जात असतात. रेग्युलर दोन किंवा तीन युनिट ब्लड दर महिन्याला थॅलसेमिया रुग्णांना लागते. त्यामुळे ब्लड डोनरची गरज असते. थॅलेसेमिया आजार असल्यास शरीरात हिमोग्लोबिन बनत नसल्याने बाहेरून रक्त देऊनच आजार झाल्यापासून आयुष्यभर दुसऱ्याच्या रक्तावर जगावे लागते. पण हे ब्लड 2016 पासून मोफत देण्यात यावे, असा सूचना आहेत. त्यामुळे थॅलेसेमियाच्या रुग्णांना विना विषाणू संक्रमित किंवा शुद्ध ब्लड कसे मिळेल हे प्रमुख आवाहन आहे. यासाठीच ब्लड बँकेकडे रक्तदाते हे नियमित रक्त देणारे असावे, तसेच स्वेछिक रक्तदाते असावेत अस बोलले जाते. कारण नियमित रक्तदाते असल्यास त्या ब्लड बँकेला पूर्वी केलेल्या चाचण्या यासह त्या डोनरसचा शारिरीक प्रकृतीचा डेटा असतो. त्यामुळे फायद्याचे आणि सोपी ठरते.
कोणत्या रक्त चाचण्या कोणत्या टेक्नॉलॉजीने करणे बंधनकारक आहे?
भारत सरकारने थॅलेसेमिया किंवा रक्तदात्याचे रक्त देण्यासाठी पाच टेस्ट बंधनकारक केल्या आहेत. यात प्रामुख्याने एचआयव्ही, हिपॅटायटीस बी आणि हिपॅटायटिस सी, सीफिलिंफ आणि मलेरिया पॅरासाईट या टेस्ट बंधनकारक केल्या आहेत. या चाचण्या करण्यासाठी रक्त विषाणू संक्रमित, तर नाही ना हे तपासण्यासाठी तीन टेक्नॉलॉजी वापरल्या जातात. यातील पहिली म्हणजे एलायझा या टेक्नॉलॉजीने ब्लड आले त्या दिवशी जरी चाचणी केली, तर त्या रक्तदात्याला चार आठवड्यापूर्वी जे संक्रम झाले आहे, ते समजते. पण या चार आठवड्या पेक्षा कमी कालावधी मधील कुठल्याही विषाणूचा संक्रमण या तपासणीत समोर येत नाही. यालाच वैदकीय भाषेत 'विंडो पिरेड' असे म्हणतात. यात एलयझा टेक्नॉलॉजी ही सर्वात जास्त विंडो पिरेड आहे. यात न्यूक्लिक ऍसिड टेस्टिंग (NAT) टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून चाचणीत 10 ते 12 दिवस अगोदर जरी संक्रमण झाले असले, तरी या चाचणी दरम्यान समोर येते. त्यामुळे दूषित रक्त ब्लडडोनर कडून मिळाल्यास वेळीच कळू शकेल, शिवाय ते दूषित रक्त कोणाला पुरवठा केला जाणार नाही.
नॅटटेस्ट रक्त चाचणीचा खर्च -