नागपूर- हिंगणघाट तरुणी जळीत प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात येणार असून हा खटला विशेष सरकारी वकील उज्वल निकम लढतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीची भेट मंगळवारी रात्री गृहमंत्री देशमुख यांनी घेतली.
हिंगणघाट पीडितेची प्रकृती स्थिर असली तरीही गंभीर - डॉक्टर केसवानी - नागपूर
पीडित तरुणीवर योग्य उपचार होत असून पुढील उपचारासाठी इतरत्र हलवण्याची गरज नसल्याचे डॉक्टर केसवानी यांनी सांगितले. पीडितेची प्रकृती स्थिर असली तरीही गंभीर असल्याचेही ते म्हणाले.
नॅशनल बर्न सेंटर मुंबईचे तज्ञ डॉक्टर सुनील केसवानी हे देखील यावेळी उपस्थित होते. डॉक्टर केसवानी व अनिल देशमुख यांनी पीडित तरुणी उपचार रुग्णालयाला भेट दिली. यावेळी सुमारे पाऊण तास गृहमंत्री देशमुख व डॉक्टर केसवानी यांनी पीडितेचे कुटुंबीय आणि डॉक्टरांशी चर्चा केली. पीडित तरुणीवर योग्य उपचार होत असून पुढील उपचारासाठी इतरत्र हलवण्याची गरज नसल्याचे डॉक्टर केसवानी यांनी सांगितले. पीडितेची प्रकृती स्थिर असली तरीही गंभीर असल्याचेही डॉक्टर केसवानी यांनी सांगितले. तर झालेला प्रकार हा निंदनीय आहे व आरोपीला कठोर शिक्षा मिळावी म्हणून खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवू. तसेच हा खटला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी लढवावा, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्यामुळे उज्वल निकम यांची नियुक्ती करू, असेही देशमुख यांनी जाहीर केले.