नागपूर - ४५ पूर्णांक ६ अंश सेल्शिअस एवढी तापमानाची नोंद नागपूरमध्ये आज झाली. उन्हाळ्यातील आतापर्यंत सगळ्यात जास्त तापमान आज नागपुरात नोंदवण्यात आले आहे. विदर्भात चार दिवस उष्णतेची लाट राहील, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे
विदर्भात उष्णतेची लाट: नागपुरात ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद - नागपूर हवामान विभाग अंदाज
गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तर तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअस पर्यंत गेल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तर तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअस पर्यंत गेल्याने नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. नागपुरात सुद्धा गेल्या ८ दिवसांपासून तापमान हे ४३ ते ४४ अंशाच्या अवती-भवती फिरत होते.
आज तापमानात एक अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. ज्यामुळे आज नागपुरातील तापमान ४५ पूर्णांक ६ अंश इतके नोंदवण्यात आले आहे. पुढील चार दिवस अश्याच प्रकारची परिस्थिती राहणार असल्याने विदर्भवासीयांसाठी अत्यंत कठीण जाणार हे मात्र निश्चित झाले आहे.