नागपूर -राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारने ब्रेक द चैन अंतर्गत लॉक-डाऊनच्या नियमात थोडी शिथिलता दिली आहे. या अंतर्गत स्थानिक प्रशासनाला नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानूसार आज नागपूर महानगरपालिकेने शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या सीताबर्डी मार्केटमध्ये होत असलेली गर्दी लक्षात घेता हा हॉकर्सला दुकाने लावण्यास मनाई केली. यामुळे संतप्त झालेल्या हॉकर्सकडून भर रस्त्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले. मुख्य मार्गावरच हॉकर्स ठिय्या आंदोलन केल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. त्यामुळे पोलिसांनी या भागात बॅरिकेटिंग करत वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळवली.
राज्यात एक जूनपासून ब्रेक द चैन अंतर्गत अनलॉकचे नवे नियम लागू झाले आहेत. या नियमाअंतर्गत सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत जिवनावश्यक वस्तूंसह अत्यावश्यक वस्तूंचे दुकान सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे. याचबरोबर छोट्या दुकानांना देखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र नागपूर महानगरपालिका प्रशासनाने हॉकर्स आणि वेंडर्स यांना दुकान लावण्यास परवानगी नाकारल्यामुळे या दुकानदारांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्याने सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या हॉकर्सकडून प्रशासनासोबत चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सोशल डिस्टन्सिंगच्यानियमांचे पालन