महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 18, 2019, 8:35 PM IST

ETV Bharat / state

दिशा कायद्याच्या धर्तीवर राज्यातील कायदा कठोर करणार- एकनाथ शिंदे

बलात्काराला आळा घालणाऱ्या कायद्यास आणखी कठोर करण्यासंदर्भात मुख्यमंत्रीसुद्धा सकारात्मक आहे. आंध्रप्रदेश सरकारने तयार केलेल्या दिशा कायद्याचा ड्राफ्ट मागवण्यात आला असल्याचे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

nagpur
एकनाथ शिंदे

नागपूर- विधानपरिषदेमध्ये आज महिला अत्याचार संदर्भात लक्षवेधी लावण्यात आली होती. याशिवाय शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील बलात्कार करणाऱ्या आरोपींना तत्काळ शिक्षा व्हावी यासाठी आंध्रप्रदेशातील दिशा नावाच्या कायद्याप्रमाणे राज्यातही कायदा करवा, अशी मागणी केली होती. यावर गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रचलित कायद्यात सुधारणा करून कायदा आणखी कठोर करण्यासंदर्भात विधी आणि न्याय विभागासोबत समन्वय साधला जाणार असल्याची माहिती दिली आहे.

माहिती देताना गृहमंत्री एकनाथ शिंदे

बलात्काराच्या आरोपीला फाशीची शिक्षा तात्काळ झाली पाहिजे या विषयी विधानपरिषद सभासदांच्या भावना तीव्र आहेत. बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपींना लावण्यात येणारी कलम ३७६ आणखी कठोर करण्याची गरज निर्माण झाली आहे. कलम ३५४ मध्ये सुधारणा करण्याची देखील आवश्यकता आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपींचा ७ दिवसात पोलीस तपास आणि १४ दिवससात न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात गृहविभाग सकारात्मक असल्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर, बलात्काराला आळा घालणाऱ्या कायद्यास आणखी कठोर करण्यासंदर्भात मुख्यमंत्रीसुद्धा सकारात्मक आहे. आंध्रप्रदेश सरकारने तयार केलेल्या दिशा कायद्याचा ड्राफ्ट मागवण्यात आला असल्याचे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-महापोर्टल घोटाळा 'व्यापम'पेक्षाही मोठा - जितेंद्र आव्हाड

ABOUT THE AUTHOR

...view details