नागपूर : सीमाशुल्क विभागानं सोनं (गोल्ड) तस्करीच्या आणखी एका प्रकरणाचा भांडाफोड केलाय. ज्यामध्ये दोन कोटी रुपयांचं शुध्द सोनं जप्त करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपीनं कॉफी मेकर मशिनमध्ये प्रत्येकी १ हजार ७४८ ग्रॅम वजनाचं सोनं लपवून आणलं. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी सोनं जप्ती असल्याच दावा कस्टम विभागाकडून करण्यात आला आहे.
- प्रवाशावर संशय :कस्टम विभागानं दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या विमानतळ मोहम्मद अहमद नामक एका प्रवाशावर संशय आल्यानं त्याला थांबवण्यात आलं होतं. तो प्रवासी शारजाहून एअर अरेबिया फ्लाइट क्र G9-415 नं पहाटे 4:10 वाजता नागपूर विमानतळावर आला होता. मोहम्मद अहमदकडं भारतीय पासपोर्ट होता. तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.
- 1 हजार 748 ग्रॅम वजनाचं सोनं सापडलं : आरोपी सोने तस्करीकरणाऱ्या रॉकेटचा भाग असल्याचा संशय सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना आला होता. त्याला थांबण्यात आलं, तेव्हा त्याच्या जवळ असलेल्या कॉफी मेकर मशिनची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यात 1 हजार 748 ग्रॅम वजनाचं सोनं आढळून आलं. कस्टम अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक केली आहे.