महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकशाहीत जनमताला महत्व, पुढील मुख्यमंत्री फडणवीसच होतील - गिरिश व्यास - भाजप प्रवक्ते गिरीश व्यास

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढील मेळाव्यात सेनेचा मुख्यमंत्री असेल अशी घोषणा केली. शिवसेनेची हे वक्तव्य भाजपला चांगलेच झोंबल्याचे दिसते आहे.

गिरिश व्यास

By

Published : Oct 9, 2019, 3:40 PM IST

नागपूर - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढील मेळाव्यात सेनेचा मुख्यमंत्री असेल अशी घोषणा केली. शिवसेनेचे हे वक्तव्य भाजपला चांगलेच झोंबल्याचे दिसते आहे. मुख्यमंत्री कोण असावा हे जनता ठरवत असून, लोकशाहीमध्ये जनमताला महत्व असल्याचे वक्तव्य भाजप प्रवक्ते गिरीश व्यास यांनी केले.

पुढील मुख्यमंत्री फडणवीस हेच - गिरिश व्यास

हेही वाचा - जगनमोहनच्या गीताची शिवसेनेने केली हुबेहुब 'नक्कल'?

हेही वाचा - एकनाथ खडसे म्हणतात... २४ ऑक्टोबरला सरकार महाआघाडीचेच येणार!


देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य टॉप पाच राज्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच पाहिजे असल्याचा टोला गिरीश व्यास यांनी शिवसेनेला लगावला. देवेंद्र फडणवीस यांच्या कामांसामोर दुसरा कोणी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल असे वाटत नाही. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच आणि देवेंद्र फडणवीस हेच असल्याचे व्यास म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details