नागपूर - शहरातील कचरा उचलण्यासाठी मनपातर्फे विविध कंपन्यांना कंत्राट दिल्या जाते. यात एजी इन्व्हायरो या कंपनीचाही समावेश आहे. या कंपनीच्या माध्यमातून कचऱ्याच्या गाडीतून कचऱ्याचे वजन वाढवण्यासाठी मातीचा भरणा करून तो डंम्पिग ग्रांऊडवर टाकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी यासंदर्भातील स्टिंग ऑपरेशन केले. ठाकरे यांनी केलेल्या या स्टिंग ऑपरेशननंतर मनपा कचरा संकलन करणाऱ्या कंपनीवर लाखोंचा दंड लावण्याची तयारी करत आहे. याप्रकरणी अप्पर आयुक्त राम जोशी यांनी चौकशी करून कारवाईचा अहवाल आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे पाठविला आहे.
कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी मातीचा भरणा; काँग्रेसच्या स्टिंगनंतर मनपाकडून कारवाईची शक्यता - नागपूर काँग्रेस आमदार
नागपूर मनपाने शहरातील दहा झोनमधील विविध भागांतील कचरा संकलन करण्याचे काम एजी एन्व्हायरो आणि बिवीजी एन्व्हायरो या खासगी कंपनीला दिले आहे. कचऱ्याच्या वजनाप्रमाणे महापालिका त्या कंपनीला पैसे देत असते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात कचऱ्याचे प्रमाण कमी राहत असल्याने त्या कचऱ्याच्या गाडीत माती भरून त्या कचऱ्याचे वजन केले जात आहे, अशी तक्रार काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांना मिळाल्या होत्या.
नागपूर मनपाने शहरातील दहा झोनमधील विविध भागांतील कचरा संकलन करण्याचे काम एजी एन्व्हायरो आणि बिवीजी एन्व्हायरो या खासगी कंपनीला दिले आहे. कचऱ्याच्या वजनाप्रमाणे महापालिका त्या कंपनीला पैसे देत असते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात कचऱ्याचे प्रमाण कमी राहत असल्याने त्या कचऱ्याच्या गाडीत माती भरुन त्या कचऱ्याचे वजन केले जात आहे, अशी तक्रार काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांना मिळाल्या होत्या. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी विकास ठाकरे यांनी कचरा संकलन कशाप्रकारे केले जात आहे, याचे स्टिंग ऑपरेशन केले. त्यामध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
विकास ठाकरे यांनी या संदर्भात स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर मनपानेही या प्रकरणाच्या चौकशी केली आहे. या प्रकरणी संबंधित कंपनीला मिळणाऱ्या महिन्याच्या बिलातून १० टक्के रक्कम कपात केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, चौकशीनंतर कोट्यवधी रुपयांचा कचरा घोटाळा पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.