नागपूर : शहरात येथे येत्या 21 आणि 22 मार्च रोजी होणाऱ्या जी- 20 गटाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. जी- 20 बैठकीत येणाऱ्या प्रतिनिधी सदस्यांना संत्रानगरी नागपूरचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दर्शन घडवण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिके कडून सुरू झाले आहेत. या अनुषंगाने सतत बैठका सुरू झालेल्या आहेत. संत्रानगरीला ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून जगापुढे यावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
50 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध : 1 मार्चपासून यासंदर्भातील नियोजित कामे पूर्ण करण्याचे व त्यानंतर पाहुण्यांचे आगमन होईपर्यंत शहर सजविण्याच्या आवाहन करण्यात आले आहे. या आयोजनाच्या माध्यमातून नागपूरचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे. त्याकरिता शासनाने 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. नागपूर महापालिकेकडून आणखी 122 कोटींचा निधीची मागणी करण्यात आली, असल्याची माहिती मनपाचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिली आहे.
सिव्हिल सोसायटीची बैठक नागपूरात : एका वर्षाच्या कालावधीमध्ये या बैठका होत आहेत. जी-20 चे यजमानपद भारताला मिळाल्यानंतर या बैठकीची सुरुवात झाली. नागपूर येथे होणारी जी-20 ही सिव्हिल सोसायटीच्या संदर्भात जागतिक स्तरावरील ध्येयधोरण ठरवणार आहे. त्यामुळे जी-20 बैठकीला सी-20 असे देखील म्हटले जाते. मुंबई येथे यापूर्वी झालेली बैठक ही व्यापारांची बैठक होती. तर पुणे येथे नुकतीच झालेली बैठक ही अर्बन 20 या संदर्भातील होती. अंतिम बैठक ही 30 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. या अंतिम बैठकीला जी -२० समूहातील प्रत्येक देशाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.