नागपूर - शहरातील गणेश पेठ बस डेपो जवळ २ ऑटो चालकांनी वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर मारहाण केलेल्या ऑटो चालकांना पोलिसांनी अटक केली. ही घटना गणेश पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मागील २ दिवसात वाहतूक पोलिसांना मारहाणीच्या २ घटना घडल्या आहेत.
वाहतूक पोलीस आणि ऑटो चालकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडीओ वायरल - driver
शहरातील गणेश पेठ बस डेपो जवळ २ ऑटो चालकांनी वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर मारहाण केलेल्या ऑटो चालकांना पोलिसांनी अटक केली.
सोनू कांबळे आणि मयूर राजूरकर असे अटक करण्यात आलेल्या ऑटो चालकांची नावे आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांवर हल्ला करणारे ऑटो चालक रस्त्याच्या मध्येच ऑटो उभा करून प्रवाशी बसवायचे ज्यामुळे वाहतूक कोंडी व्हायची. या संदर्भात आज वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या ऑटो चालकांवर कारवाईचा बडगा उभारला होता. या कारवाईमुळे दुखावलेल्या ऑटो चालकांनी थेट पोलिसांनाच मारहाण केली.
उपस्थित नागरिकांनी पोलीस आणि ऑटो चालकांमधील फ्री-स्टाईल मारामारीचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो वायरल केला. या संदर्भात गणेशपेठ पोलिसांना सूचना मिळताच पोलिसांची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर त्या ऑटो चालकांना अटक करण्यात आली. हेल्मेट न घातल्याने वाहन चालकाला जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसांवर एका व्यक्तीने हल्ला केल्याची घटना ताजी असताना, आज पुन्हा अशाच प्रकारची घटना घडली.