महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, १५ ते २० जण जखमी - 7 injured

जिल्ह्यातील कुही परिसरात ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून १५ ते २० जण जखमी झाले आहेत. जखमींचा ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघा

By

Published : Jul 8, 2019, 8:01 AM IST

Updated : Jul 8, 2019, 9:57 AM IST

नागपूर - जिल्ह्यातील कुही परिसरात ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून १५ ते २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात

महालक्ष्मी ट्रॅव्हल्स गडचिरोलीच्या वडसेवरून नागपूरच्या दिशेने जात होती. यावेळी हा अपघात झाला. ट्रव्हल्सने रेतीच्या उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला तर १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रात्री उशिरा घडल्याने पोलिसांना मदतकार्य करण्यात अनेक अडचणी आल्या. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी ट्रॅव्हल्समध्ये ४० च्या आसपास प्रवासी होते. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे तर १५ ते २० जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये नागपूरच्या दिघोरी येथील राहणारे अनिल कवटे, प्रमिला कवटे आणि ट्रॅव्हल्सच्या चालक कार्तिक डोंगल यांच्यासह सोनू नावाच्या तरुणाचा मृतात समावेश असल्याचे समोर आले आहे.

Last Updated : Jul 8, 2019, 9:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details