महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीवर 'आपली बस'च्या चार कंडक्टरांकडून बलात्कार

पोलिसाच्या तपासात ती रायपूरला असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता तिने आपल्यावरील सर्व अत्याचाराची माहिती पोलिसांच्या समोर उघड केली.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By

Published : Mar 7, 2019, 3:25 PM IST

नागपूर - शहरातील अंतर्गत वाहतुकिसाठी नागपूर महानगर पालिकेच्या आपली बस अर्थात स्टार बस धावतात. हजारो शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी यातुन ये-जा करतात. अशाच एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर आपली बस च्या ४ कंडक्टरकडून मागच्या ७ महिन्यापासून शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

या घटनेमुळे शहरातील शिक्षण घेत असणाऱ्या मुलीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर मुलगी ही एका महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिची आपली बसचा कंडक्टर असणारा धर्मपाल मेश्राम सोबत ओळखी झाली. पुढे त्यांनी एकमेकांना मोबाईल नंबर दीले. यानंतर त्यांनी विद्याथिनी सोबत मैत्री करून मानाकापूर रोडवर असणाऱ्या अलेक्सिस हॉस्पिटलजवळील पूजा रेसिडेंसीवर तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांनंतर धर्मपाल यांने आपल्या कंडक्टर मित्रांना देखील या विद्यार्थिनीचा संपर्क करून दिला. त्यांनी पण तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपी आशिष लोखंडे, उमेश मेश्राम, शैलेश वंजारी हे सर्व आपली बसचे कंडक्टर आहेत.

सात महिन्या नंतर मुलीला आपण गर्भवती असल्याची शंका आली. यामुळे बदनामीच्या भीतीने तिने घरातून पळ काढला. कुटुंबातील लोकांनी तीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसाच्या तपासात ती रायपूरला असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता तिने आपल्यावरील सर्व अत्याचाराची माहिती पोलिसांच्या समोर उघड केली. पोलिसांनी चारही कंडक्टरना अटक केली आहे. पुढील तपास मानाकापूर पोलीस स्टेशन चे कर्मचारी करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details