महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिंताजनक..! राज्यातील पाच जिल्ह्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव - नागपूर शहर बातमी

कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचे सावट राज्यात पसरले आहे. मध्यप्रदेशच्या भोपाळ येथील प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू पसरला आहे.

पोपट
पोपट

By

Published : Jan 11, 2021, 4:11 PM IST

Updated : Jan 11, 2021, 5:40 PM IST

नागपूर - कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचे सावट राज्यात पसरले आहे. मध्यप्रदेशच्या भोपाळ येथील प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू पसरला आहे.

परभणी जिल्ह्यानंतर राज्यात मुंबई, ठाणे, रत्नागिरी व बीडमध्ये काही दिवसांमध्ये मृत पक्षाचे नमुने हे भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यात हे नमुन्यांची अहवाल राज्यात चिंता वाढवणारा ठरला आहे. कोरोना काळात पोल्ट्री व्यवसायास फटका बसला होता. आता बर्ड फ्लूच्या भीतीमुळे चिकन व अंड्यांच्या मागणीत घट झाली आहे.

कुठे-कुठे आढळेल मृत पक्षी

मुंबईत दोन कावळे, तर ठाण्यात पोपट आणि पान बगळ्यात बर्ड फ्लूचे व्हायरस आढळले आहे. परभणीमध्ये कोंबडी व पान बगळ्यात बर्ड फ्लूचा विषाणू असल्याचे सिद्ध झाले. दापोलीमध्ये कावळ्यात व्हायरस सापडला आहे. बीडमध्ये बर्ड फ्लूचे दिसून आल्याने या पक्षांचे बर्ड फ्लू अनेक जिल्ह्यात पसरलेला असल्याने धोका निर्माण झाका आहे.

बोलताना मंत्री सुनील केदार

नागपूर, अमरावती, लातूर जिल्ह्यातील नमुन्यांचे अहवाल बाकी

यात नागपूर जिल्ह्यातील तसेच अमरावती जिल्ह्यातील काही भागात मृत पोपट, कावळे हे पक्षी अचानक मृतावस्थेत आढळून आले आहे. यामुळे याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. याचा अहवाल येणे बाकी असलेले तर शक्यता बर्ड फ्लूची असल्याने संकट नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात घोंगावत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मुख्यमंत्र्याशी बैठकीत होणार चर्चा

या विषयाला अनुसरुन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी बैठक बोलावल्याचे सांगितले आहे. दुपारी 3 वाजता ही बैठक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Last Updated : Jan 11, 2021, 5:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details