नागपूर -महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर मंगळवारी रात्री अज्ञातांनी गोळीबार केला. वर्धा रोडवरील एम्प्रेस पॅलेसजवळ ही घटना घडली. यामध्ये जोशी बचावले असून त्यांचे कुटुंबीय देखील सुखरूप आहे.
नागपूर महापौरांच्या गाडीवर गोळीबार, जोशी थोडक्यात बचावले - नागपूर महापौरांच्या गाडीवर गोळीबार
नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी शहरातील समस्या सोडवण्यासाठी १०० तक्रार पेट्या लावल्या आहेत. यामध्ये देखील काही दिवसांपूर्वी त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते. अधिवेशनामुळे शहरातील संपूर्ण पोलीस विधानभवन परिसरात बंदोबस्तामध्ये आहेत.
महापौर जोशी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. परत नागपूरच्या दिशेनी येत असताना ६ ते ७ दुचाकींचा ताफा आला आणि त्यांच्या गाडीवर अचानक गोळीबार केला. महापौरांनी प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
महापौरांनी शहरातील समस्या सोडवण्यासाठी १०० तक्रार पेट्या लावल्या आहेत. यामध्ये देखील काही दिवसांपूर्वी त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते. अधिवेशनामुळे शहरातील संपूर्ण पोलीस विधानभवन परिसरात बंदोबस्तामध्ये आहेत. याचाच फायदा घेत हल्लेखोरांनी महापौर जोशींवर हल्ला केला.