महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खंडणी आणि फसवणूक प्रकरणी शिवसेनेच्या नेत्यावर नागपुरात गुन्हा दाखल - खंडणीप्रकरणी सेना नेत्यावर गुन्हा

नागपूरमधील शिवसैनिकांवर खंडणी वसूल करत असल्याचे आरोप लागायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या युवा नेत्यांवर सध्या नागपुरात गुन्हे दाखल होत आहेत. युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षांनी एका फायनान्स कंपनी मालकाकडे 8 लाख रुपयांची खंडणी मगितल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता शिवसेनेचे शहर प्रमुख मंगेश कडव यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

Fir against nagpur shivsena leader for extortion case
खंडणी आणि फसवणूक प्रकरणी शिवसेनेच्या नेत्यावर नागपुरात गुन्हा दाखल

By

Published : Jul 1, 2020, 9:02 PM IST

Updated : Jul 1, 2020, 10:17 PM IST

नागपूर - शहरातील शिवसैनिकांवर खंडणी वसूल करत असल्याचे आरोप लागायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या युवा नेत्यांवर सध्या नागपुरात गुन्हे दाखल होत आहेत. युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षांनी एका फायनान्स कंपनी मालकाकडे 8 लाख रुपयांची खंडणी मगितल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता शिवसेनेच्या शहर प्रमुखांवर धमकावून खंडणी मागणे, संपत्तीवर अवैध कब्जा करणे, ती रिकामी करण्यासाठी पुन्हा खंडणी मागणे, दुकान आणि फ्लॅट विक्रीच्या व्यवहारात फसवणूक करणे असे अनेक आरोप लावण्यात आले आहेत.

खंडणी आणि फसवणूक प्रकरणी शिवसेनेच्या नेत्यावर नागपुरात गुन्हा दाखल

मंगेश कडव असे आरोप लागलेल्या शिवसेना शहर प्रमुखाचे नाव असून, ते सध्या अंडरग्राउंड झाले आहेत. नागपूर शिवसेनेचे शहर प्रमुख मंगेश कडव विरोधात नागपूरच्या अंबाझरी, सक्करदरा, हुडकेश्वर, बजाजनगर पोलीस स्थानकात गेले अनेक दिवस तक्रारी येण्याचा ओघ सुरू झाला आहे. पोलिसांनी सर्व तक्रारींचा तपास करून तीन प्रकरणांमध्ये मंगेश कडव यांच्या विरोधात गुन्हे दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे.

शिवसेनेचे शहर प्रमुख मंगेश कडव


पुराणिक लेआऊटमध्ये एका घराचा अवैध ताबा घेत ताबा सोडण्याच्या मोबदल्यात मूळ मालकाला मारहाण करत त्याच्याकडून दीड कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी अंबाझरी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला आहे. तर मानेवाडा परिसरात तीन दुकानं खरेदी करण्यासाठी देवा शिर्के या तक्रारकर्त्याने १८ लाख रुपये दिल्यानंतरही मंगेश कडव ने दुकानाचे विक्रीपत्र केले नाही. परस्पर त्याचे दुकानं बँकेत गहाण ठेऊन बँकेतून ही ५० लाखांचे कर्ज उचलले. याप्रकरणीसुद्धा सक्करदरा पोलीस स्थानकात मंगेश कडव याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय मानेवाडा परिसरातील एका फ्लॅटच्या विक्रीमध्ये मंगेश कडवने फसवणूक केल्याची तक्रार दिनेश आदमने यांनी पोलिसांकडे दिली होती. त्यानंतर तपास करत पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

Last Updated : Jul 1, 2020, 10:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details