नागपूर - शहरात वाढत्या सायबर गुन्ह्यांवर आळा घालण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या सायबर सेलच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात असताना आता चक्क शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याच नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. एवढंच नाही तर त्या बनावट अकाउंटवरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट देखील पाठवण्यात आल्याचा प्रकार पुढे आल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
चक्क नागपूर पोलीस आयुक्तांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट - नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याच नावाने बनावट फेसबुक अकाऊंट
नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याच नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. एवढंच नाही तर त्या बनावट अकाउंटवरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट देखील पाठवण्यात आल्याचा प्रकार पुढे आल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
सायबर सेलने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून बनावट अकाऊंट उघडणाऱ्याचा शोध सुरू केला आहे. मात्र नागपूर पोलीस दलाचे प्रमुख असलेल्या व्यक्तीचे फेक अकाउंट तयार होत असेल तर इतरांच्या सामाजिक सुरक्षेचं काय, अशी चर्चा शहरात रंगली आहे
बनावट फेसबुक अकाउंटवरून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या ओळखीच्या ३२ जणांना ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ पाठविण्यात आली आहे. काहींनी ती ‘अॅक्सेप्ट’ केली. दरम्यान आधीच ‘फेसबुक फ्रेण्ड’ असताना पुन्हा ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ आल्याने त्यांच्या काही मित्रांनी अमितेशकुमार यांच्याशी थेट संपर्क साधला. आपण कोणत्याही प्रकारची ’फ्रेण्ड रिक्वेस्ट’ पाठविली नसल्याचे अमितेशकुमार यांनी त्यांना सांगितले. हा बनावटपणा उघडकीस येताच अमितेशकुमार यांनी लगेच सायबर सेलला याबाबत कळविले. बनावट अकाऊंट तयार करणाऱ्यांचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत.
अद्याप गुन्हा दाखल नाही -
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या संदर्भात सायबर सेलकडे अधिकृत तक्रार केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात आद्यप तरी गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र पोलीस आयुक्तांनी दिलेल्या निदेशांचे पालन करत सायबर सेलने प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू केला आहे.