नागपूर - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. सोबतच धनगर समाजाला दिलासा देणारा होता. मात्र, हे अतिरिक्त बजेट असल्याने याचा फारसा फायदा होईल असे वाटत नसल्याचे मत, जेष्ठ अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले आहे.
अतिरिक्त अर्थसंकल्पाचा फारसा फायदा नाही - श्रीनिवास खांदेवाले - आगामी निवडणूक
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पाकडून फारशा अपेक्षा करता येणार नाहीत. कारण, पुढे असलेला पावसाळा त्यामुळे आर्थिक विकास दर मंदावणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू होणारी आचारसंहिता आणि निवडणुकीच्या तयारीत अधिकारी वर्ग गुंतणार आहे. त्यामुळे या अतिरिक्त अर्थसंकल्पाची अंमलबजावणी कशी होणार हा प्रश्न आहे.
जेष्ठ अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले
काही तरतुदी अल्प मुदतीच्या असतात तर काही लांब मग त्या तरतुदी कशा राबविल्या जाणार हे सुद्धा महत्त्वाचे आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात प्रत्येक घटकाला खुश करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, याचा फारसा फायदा होईल, असे वाटत नसल्याचे मत अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.