नागपूर -गेल्या काही महिन्यापासून बंद असेलेली नागपूर मेट्रो दोन दिवसापासून पुन्हा धावायला लागली आहे. अस असले तरी मेट्रोत प्रवास करण्यासाठी प्रवासीच नसल्याने गाडीत मोजकीच माणसं पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवासी संख्या वाढावी, या अनुषंगाने शहरातील बर्डी स्टेशनवर पुस्तक प्रदर्शनी भरवण्यात आले आहे. तर सुभाष नगर स्टेशनवर जुन्या वस्तूंचे माहिती देणारे साहित्यांचे प्रदर्शन करण्यात आले आहे. नागपूर मेट्रो व काही संस्थानी मिळून हा उपक्रम राबवला आहे. यामुळे मेट्रोत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल, हा उद्देश मेट्रोकडून बाळगण्यात येत आहे.
नागपूर मेट्रो स्टेशनवर भरले पुस्तके आणि जुन्या साहित्यांचे प्रदर्शन
गेल्या काही महिन्यापासून बंद असेलेली नागपूर मेट्रो दोन दिवसांपासून पुन्हा धावायला लागली आहे. अस असले तरी मेट्रोत प्रवास करण्यासाठी प्रवासीच नसल्याने गाडीत मोजकीच माणसं पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवासी संख्या वाढावी, या अनुषंगाने शहरातील बर्डी स्टेशनवर पुस्तक प्रदर्शनी भरवण्यात आले आहे.
शहरातील अंबाझरी अँक्वा रूटवर धावणाऱ्या मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होण्यासाठी नागपूर मेट्रोकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. आधी ५०% तिकिट दर कमी करण्यात आले आहे. आता शहरातील बर्डी स्टेशनवर पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले आहे. याही पलिकडे रेल्वेबाबत पुरातन माहिती देणाऱ्या पत्रकांचे प्रदर्शनही करण्यात आले आहे. शिवाय ऐतिहासिक वस्तूंचे संग्रह लोकांपुढे प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आले.
या प्रदर्शनात ब्रिटिशकालीन टपाल तिकिट, रेल्वेच्या इंजीनबद्दल माहिती देणारे पत्रक प्रदर्शित करण्यात आले आहे. नागपूर मेट्रो व काही खासगी संकलनकर्त्यांकडून हे उपक्रम राबविण्यात येत आहे. शिवाय या प्रदर्शनाला नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकांना जुन्या साहित्यांची, वस्तूंची माहिती व्हावी यासाठीच हा उपक्रम मेट्रोच्या माध्यमातून राबवत असल्याचे प्रदर्शनकर्त्यांचे मत आहे. असे असले तरी अशा उपक्रमामुळे का होईना मेट्रोत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल, असा आशावादही मेट्रो विभागाकडून व्यक्त केला जात आहे.