निधी चौधरींकडून राज्य सरकारने मागविले स्पष्टीकरण; त्यानंतर पाणी पुरवठा विभागात केली बदली
मुंबई - आयएएस अधिकारी निधी चौधरी यांनी महात्मा गांधीविरोधात वादग्रस्त ट्वीट केले होते. याप्रकरणी राजकीय पक्षांकडून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी होत होती. आज राज्य सरकारने याप्रकरणी निधी चौधरी यांना याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. याबरोबरच मुंबई महानगरपालिकेतून त्यांची बदली राज्याच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयात करण्यात आली आहे.वाचा सविस्तर
'जग जिंकता येते पण पाठीवर थाप मारायला कोणीच नसतं'..., गोपीनाथ मुंडेंसाठी पंकजांची भावनिक कविता
बीड - दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त जिल्ह्यात आज विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पंकजा मुंडेंनी ट्विटरवर एक भावनिक कविता शेअर करत गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केले आहे. वाचा सविस्तर
दुष्काळ बेतला जीवावर; गाळ काढायला उतरले विहिरीत, काळाने घातला तिघांवर घाला
रत्नागिरी - गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या तिघांवर काळाने घाला घातला. लांजा तालुक्यातील निवसर येथे रविवारी सायंकाळी ही घटना घडली. विनय सागवेकर, नंदकुमार सागवेकर आणि अनिल सागवेकर असे विहिरीत गाळ काढताना मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. रविवारी मध्यरात्री या तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. वाचा सविस्तर
भारतीय वायुसेनेचे आयएएफ एएन-३२ विमान बेपत्ता; शोधकार्य सुरू
नवी दिल्ली - आसाममधील जोरहात विमानतळावरून उड्डाण केलेले आएएफ एएन-३२ हे लष्करी विमान बेपत्ता झाले आहे. विमान अरुणाचल प्रदेश येथील मेनचुका विमानतळाकडे निघाले होते. विमानात वायुसेनेचे १३ कर्मचारी आहेत. १२ वाजून २५ मिनिटांनी उड्डाण केल्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून विमानाचा संपर्क तुटला आहे. मेनचुका हवाईक्षेत्रात हे विमान बेपत्ता झाले आहे. वाचा सविस्तर
कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळ मुक्त करणार - देवेंद्र फडणवीस
बीड - कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्यात आणून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करु असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी कृष्णा खोऱ्याचे ६० टीएमसी पाणी मराठवाड्याला देणार आहे. यासाठी २५ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. वाचा सविस्तर