नागपूर-टाकाऊ प्लास्टिक ही जगातील सर्वात मोठी समस्या आहे. मात्र, याच टाकाऊ प्लास्टिकपासून नागपूरच्या अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी विटा तयार केल्या आहेत. या प्रयोगामुळे प्लास्टिकची विल्हेवाट लावण्याबरोबरच रोजगार निर्मती देखील होऊ शकते.
नागपूर: टाकाऊ प्लास्टिक पासून बनवल्या विटा, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम - buloding
टाकाऊ प्लास्टिकपासून नागपूरच्या अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी विटा तयार केल्या आहेत. या विटा १० टनापर्यंतचा दाब सहन करू शकतात.
देशात दररोज १५ हजार टन प्लास्टिकचा कचरा तयार होतो. त्यापैकी ११ हजार टन प्लास्टिकचा पूर्णवापर होतो आणि ४ हजार टन प्लास्टिक तसेच राहते. प्लास्टिक अविघटनशील असल्यान प्रदूषणात वाढ होत आहे. प्लास्टिक बंदी असताना देखील प्लास्टिकचा सर्रास वापर होतो आणि कचऱ्यातील प्लास्टिक जनावरांचा पोटात जाते. त्यामुळे कित्येक जनावरे दगावतात. या समस्यांवर उपाय म्हणून अंजुमन महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या विटा बनविल्या आहेत.
या विटा १० टनापर्यंतचा दाब सहन करू शकतात. ४ हजार टन प्लास्टिकवर प्रक्रिया केल्यास सुमारे २ हजार कोटींचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. १३ बाय ५ इंचाचे ब्लॉक बनविण्यासाठी २ किलो कचरा आवश्यक असतो. या प्लास्टिक कचऱ्याला हायड्रोलीक मशीनमध्ये १५० अंशावर मोल्डिंग केले जाते. त्यात वाळू आणि रसायन टाकून विटा बनविल्या जातात, अशी माहिती विभाग प्रमुखांनी दिली आहे.