महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासदार महोत्सवात ८०० कलाकारांनी नृत्य, वादन आणि गायनासह सादर केली कला

खासदार महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सूर ताल आणि सांसद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीतकार शैलेश दाणी आणि बासुरी वादक अरविंद उपाध्याय यांच्या मार्गदर्शनात हे कार्यक्रम झाले. ८०० कलाकारांनी एकाच मंचावर हे वाद्यगायन केले.

eight hundred artist performed with dance, music and singing in khasdar festival at nagpur
नागपूर - खासदार महोत्सवात ८०० कलाकारांनी नृत्य, वादन आणि गायनासह सादर केली कला

By

Published : Nov 30, 2019, 7:53 AM IST

नागपूर -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे शुक्रवारी उद्घाटन झाले. जागतिक कीर्तीचे अध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्धाटन करण्यात आले. खासदार महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून १७ दिवस हा महोत्सव चालणार आहे. या महोत्सवात गायन, संगीत, नृत्य आणि नाटक अशा अनेक मनोरंजक गोष्टींची मेजवानी नागपूरकरांना मिळणार आहे.

नागपूर - खासदार महोत्सवात ८०० कलाकारांनी नृत्य, वादन आणि गायनासह सादर केली कला

हेही वाचा -भारताचा जीडीपी ४.५ टक्क्यांवर घसरला, ६ वर्षांतील सर्वात निचांकी स्तरावर

खासदार महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सूर ताल आणि सांसद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीतकार शैलेश दाणी आणि बासुरी वादक अरविंद उपाध्याय यांच्या मार्गदर्शनात हे कार्यक्रम झाले. ८०० कलाकारांनी एकाच मंचावर हे वाद्यगायन केले. यामध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चित्रांचा भव्य नजराणा सादर करण्यात आला. यामध्ये स्थानिक कलाकारांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांचा सहभाग होता.

ABOUT THE AUTHOR

...view details