महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Elgar Parishad case : तुरुंगात कैद असलेल्या हनी बाबुंचे मोठे यश, बेल्जियम विद्यापीठ देणार मानद डॉक्टरेट - हनी बाबू मानद डॉक्टर

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी आणि नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात बंद असलेले दिल्ली विद्यापीठाचे माजी सहयोगी प्राध्यापक डॉ. हनी बाबू यांना तुरुंगात असतानादेखील मोठे यश मिळाले आहे. बेल्जियममधील विद्यापीठातून त्यांना मानद डॉक्टरेट पदवी मिळणार आहे. ही माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे.

हनी बाबू मानद डॉक्टरेट
Dr Hany Babu doctorate

By

Published : Mar 24, 2023, 2:11 PM IST

नागपूर :हनी बाबूंची पत्नी जेनी रोवेना म्हणाल्या, की बेल्जियमच्या गेन्ट विद्यापीठाच्या कला आणि तत्त्वज्ञान विद्याशाखेकडून हनी बाबू यांना शुक्रवारी मानद डॉक्टरेट प्रदान केली जाणार आहे. गेंट युनिव्हर्सिटीच्या कला आणि तत्त्वज्ञानाच्या विद्याशाखेने हनी बाबू यांचे कार्यकारी समितीसाठी नामांकन केले होते. त्यांनी शैक्षणिक स्वातंत्र्याचे महत्त्व, भाषा अधिकार आणि अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याने विद्यापीठाने दखल घेतली आहे.

24 मार्च रोजी विद्यापीठाच्या 'डाईज नतालिस' अर्थात वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात डिप्लोमा आणि प्रतिज्ञापत्र दिले जाईल, असे हनी यांच्या पत्नीने सांगितले. डॉ. हनी बाबूंचे प्रवर्तक डॉ. अ‍ॅनी ब्रेइटबार्थ, गेन्ट विद्यापीठातील भाषाशास्त्र विभागाच्या जर्मन विभागातील ऐतिहासिक भाषाविज्ञानाच्या सहयोगी प्राध्यापक यांना हॅनी बाबूंच्या सन्मानाचे बॅज दिले जाणार आहेत. हनी हे तुरुंगात असल्याने परवानगी मिळाल्यानंतरच त्यांच्याकडे बॅज सुपूर्द केले जाणार आहेत.

आरोग्याच्या समस्यांचा तुरुंगात करत आहेत सामनाहनी बाबू यांना मोतीबिंदूची शस्त्रक्रियेसह पोटाचे विकार आणि हाडांशी संबंधित आजार आहेत. मुंबईतील सैफी हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी त्यांच्या वकिलांनी मागणी केली होती. मोतीबिंदूमुळे ते दृष्टी गमावत असून पोटदुखी आणि गुडघेदुखीचाही त्रास होत असल्याचे त्यांनी न्यायालयात वकिलामार्फत म्हटले होते. अनेक आजारांचा सामना करताना त्यांना दैनंदिन कामे करण्यासही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कशामुळे हनी बाबू यांना अटक झाली?पेशव्यांचे मराठा सैन्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200 व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 रोजी भीमा कोरेगांव शौर्य दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या युद्धात पेशव्यांविरोधात ईस्ट इंडिया कंपनीबरोबर महार रेजिमेंट लढल्याने त्याचे स्मरण करण्यात येत होते. 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील वक्तव्यानंतर हिंसाचार उसळला होता. पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू करत देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली होती. त्यामध्ये हनी बाबूंचाही समावेश आहे.

हेही वाचा-PM Modi in Varanasi: टीबीच्या विरोधात लढण्यासाठी काशीतून नवी ऊर्जा मिळेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

ABOUT THE AUTHOR

...view details