नागपूर - जिल्ह्यातील बेला पोलीस ठाण्यांतर्गत धमकोली शिवारात दोन सख्या भावांची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संतोषसिंग तीलपितिया आणि संगतसिंग तीलपितिया असे हत्या झालेल्या मृतांची नावे आहेत.
दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरले; सख्या भावांची हत्या करून मृतदेह फेकले जंगलात - double murder
बेला पोलीस ठाण्यांतर्गत धमकोली शिवारात दोन सख्या भावांची हत्या करुन मृतदेह जंगलात फेकून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
हत्या
संतोषसिंग आणि संगतसिंग तीलपितिया हे दोघे 16 जुलैपासून त्यांच्या भिवापूर तालुक्यातील महालगाव या गावातून बेपत्ता होते. सोमवारी रात्री उशिरा दोघांचे कुजलेल्या अवस्थेतले मृतदेह धमकोली शिवारातील जंगलात आढळले.
या दोघांची हत्या करून त्यांचे मृतदेह जंगलात फेकण्यात आले असावेत असा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन, दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. सध्या या दुहेरी हत्या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
Last Updated : Jul 23, 2019, 2:52 PM IST