नागपूर- राज्यात दारूचे दुकान सुरू करण्याची मागणी जोर धरत असताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी याला विरोध केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबल्या शिवाय राज्य सरकारने कोणत्याही प्रकारच्या मद्य विक्रीला परवानगी देऊ नये, अशी मागणी राज्याचे माजी राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
राज्य सरकारने दारूची दुकान उघडायला परवानगी देऊ नये - बावनकुळे
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन घोषित केल्यापासून रोजगार उपलब्ध नसल्याने अनेकांसमोर दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा बिकट परिस्थिती राज्य सरकारने महसूल मिळवण्याच्या लोभापोटी राज्यात देशी-विदेशी मद्य विक्रीला परवानगी दिल्यास अनेकांचे संसार विस्कटण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन घोषित केल्यापासून रोजगार उपलब्ध नसल्याने अनेकांसमोर दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा बिकट परिस्थिती राज्य सरकारने महसूल मिळवण्याच्या लोभापोटी राज्यात देशी-विदेशी मद्य विक्रीला परवानगी दिल्यास अनेकांचे संसार विस्कटण्याची शक्यता आहे. शिवाय दारू विकत घेण्यासाठी लोकांची झुंबड होण्याची भीती आहे, त्यामुळे सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचा फज्जा उडू शकतो म्हणूनच राज्य सरकारने कोणत्याही मद्य विक्रीला परवानगी देऊ नये, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दारू विक्रीस परवानगी द्यावी, त्यातून राज्याला महसूल मिळवता येईल, अशी मागणी केली होती. तर केंद्र सरकारने आज मॉल वगळता काही दुकाने सुरू करायला परवानगी दिली आहे. मात्र यातून दारू विक्रीची दुकाने सुरू करण्यास कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नाही. तर भाजप नेते व माजी मंत्री बावनकुळे यांनीही दारू विक्रीस परवानगी न देण्याची मागणी केली आहे.