नागपूर - कोरोना विषाणू संदर्भांत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. अफवांचा पेव वाढतच जात असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कोरोना विषाणूला घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, सरकारने सर्व उपाय योजना केल्या आहेत. नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जात आहे, सर्व शासकीय रुग्णालयात कोरोनासंदर्भात वॉर्ड आणि डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे टोपे म्हणाले.
"कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही, मात्र प्रत्येकाने सतर्कता बाळगावी" हेही वाचा -कुंपणच खातंय शेत, पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानाच्या गावाला भ्रष्टाचाराची किड...
कोरोना विषाणू संदर्भात आशांना (आरोग्य सेविका) 11 ते 13 मार्च दरम्यान प्रशिक्षण दिले जाणार आहे. घाबरून जाण्याची गरज नाही तसेच मास्कची गरज नाही. त्यामुळे मास्कची साठवणूक करू नका, असे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केले आहे. कोरोना विषाणूबाबत अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. शाळा बंद करा, असेही सांगितले जात आहे. काही शासकीय कार्यालयात बायोमेट्रीक पद्धती बंद करण्यात आली, हे चुकीचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे होळी मोठ्या प्रमाणात साजरी न करता छोट्या पद्धतीने साजरी करावी. काही दिवसांनी आयपीएल स्पर्धा आहे, मात्र या कोरोनाच्या भीतीमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यासंदर्भात विचार सुरू असून, यासंदर्भात लवकरच निर्णय होणार असल्याचे टोपे म्हणाले आहेत.
हेही वाचा -आरबीआयच्या निर्बंधानंतर येस बँकेवर 'हे' नियम लागू होणार