नागपूर - राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक न्यायालयाकडून २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्याची माहिती लपवल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक न्यायालयाकडून समन्स माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाचा समन्स पोलिसांनी त्यांच्या नागपूरच्या घरी पोहचवला आहे. २०१४ ची निवडणूक लढवताना दाखल केलेल्या शपथपत्रात २ गुन्ह्यांची माहिती लपावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
हेही वाचा - नागपूर : कस्तुरचंद पार्क मैदानातील खोदकामात पुन्हा आढळल्या पुरातन तोफा
२०१४ च्या निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याचे प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा खटला सत्र न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी अॅड. सतीश उके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यानंतर सत्र न्यायालयाने 1 नोव्हेंबरला हा खटला सुरू करून प्रतिवादी असलेले देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली होती.
हेही वाचा - १९६९ साली बाळासाहेब ठाकरे नागपुरात आले होते; 'या' पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला होता हल्ला