नागपूर- ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा निमित्ताने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने पवित्र दीक्षाभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन ८ ऑक्टोंबरला करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून थायलंड येथील भदन्त डॉ. परमहा व म्यानमार येथील महाउपासक टेंग ग्यार हे उपस्थित राहणार आहेत, याची माहिती स्मारक समितीने पत्रकार परिषदेत दिली.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याला जपानचे भंते नोबुहीरो कुबोडेरा, शीनचीरो किशी, सिईगो ससहारा हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. ८ ऑक्टोबरला सकाळी ६ वाजता स्मारक समितीतर्फे ‘धम्मपहाट’ या बुद्ध-भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता भदन्त सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत सामूहिक बुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आले आहे.