नागपूर: आजपासून पुढील दहा वर्षात जर भारताला सनातन राष्ट्र घोषित न केल्यास पुढील पंचवीस वर्षानंतर भारत सेक्युलर देश राहू शकेल का? असा प्रश्न कथाकार देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी उपस्थित केला. सनातनींनी किमान चार-पाच मुले जन्माला घालावीत, असे वादग्रस्त विधान केले आहे आहे. 22 फेब्रुवारी ते 01 मार्च 2019 या कालावधीत रेशमबाग मैदान, नागपूर येथे कथाकार देवकीनंदन ठाकूर महाराज यांच्या मुखातून श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देवकीनंदन ठाकुर यांचे वक्तव्य: ते पुढे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात जास्त आक्रमक सनातनींवर झाले आहे. दुसऱ्या धर्मात चार बायका चाळीस मुले यावर कुणीही आक्षेप घेत नाही. त्यामुळे जोपर्यंत जनसंख्या नियंत्रण कायदा अस्तित्वात येत नाही तो पर्यंत सनातनींनी किमान चार-पाच मुले जन्माला घालावे, असे वादग्रस्त वक्तव्य कथाकार देवकीनंदन ठाकूर यांनी केले आहे.
सनातन बोर्ड स्थापन करावा:ज्याप्रमाणे देशात वफ्त बोर्ड अस्तित्वात आहे, त्याचप्रकारे केंद्र सरकारने सनातन बोर्डची स्थापना करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे, याकडे केंद्र सरकारने गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी केली आहे. आपला भारत देश सनातन धर्माला मानणारा राहिलेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण सेक्युलर झालो आहे, असेही ते म्हणाले.