नागपूर - महाविकास आघाडीचे सरकार हे दिलेला शब्द पाळत नाही. त्यांनी दिलेला सरसकट कर्माफीच्या शब्दाचे काय झाले? हे असा सवाल करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी सभात्याग केला. तसेच हे सरकार विश्वासघात करत असल्याचे फडणवीस म्हणाले.
सरसकट कर्माफीचे काय झाले? सरकारला सवाल करत विरोधकांचा सभात्याग - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सरकारवर टीका
महाविकास आघाडीचे सरकार हे दिलेला शब्द पाळत नाही. त्यांनी दिलेला सरसकट कर्माफीच्या शब्दाचे काय झाले? हे असा सवाल करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी सभात्याग केला. तसेच हे सरकार विश्वासघात करत असल्याचे फडणवीस म्हणाले.
या सरकारने सरसकट कर्जमाफी करण्याचा शब्द दिला होता. मात्र, तो शब्द पाळला नाही. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार मदत करण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते. मात्र, तेआश्वासन पाळले नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचे या सरकारने सांगितले होते. मात्र, हे सरकार दिलेला शब्द पाळत नाही. या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचे फडणवीस म्हणाले.
२ लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी
२ लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात केली. शेतकऱ्यांना कोणत्याही विनाअट ही कर्जमाफी केली जाणार आहे. ही कर्जमाफी २०१५ पासून केली जाणार आहे.
TAGGED:
विरोधकांचा सभात्याग