महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई महानगरपालिकेत इतके घोटाळे करून देखील हे तोंड वर करून बोलतात कसे - देवेंद्र फडणवीस - मुंबई महानगरपालिकेत इतके घोटाळे

Devendra Fadnavis Reaction : मुंबई महानगर पालिकेच्या २५ वर्षातील कामकाजाचे ऑडिट होणार आहे. या संदर्भातली आता माझ्याकडे माहिती नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष महापौर शिवसेनेचा आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन शिवसेनेचा होता. कफन घोटाळा, कोविड घोटाळा हे सर्व घोटाळे कुठे झाले आहे तर ते मुंबई महानगरपालिकेत झाले. मुंबई महानगरपालिकेत इतके घोटाळे केल्यानंतर आश्चर्य वाटतं की, हे तोंड वर करून बोलतात कसे, असेही ते म्हणाले.

Devendra Fadnavis News
देवेंद्र फडणवीस

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2023, 10:40 PM IST

माहिती देताना देवेंद्र फडणवीस

नागपूरDevendra Fadnavis Reaction : जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात आज नागपूर विधानसभेवर मोर्चा निघाला. मागणी संदर्भात कर्मचारी संघटनांनी १४ तारखेपासून कामबंद हाक दिली आहे. यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, जी समिती तयार केली होती, त्या समितीचा अहवाल नुकताच आलेला आहे. आता त्या अहवालावर राज्य सरकारची भूमिका आणि कर्मचारी युनियनची भूमिका या संदर्भात चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्याचवेळी केंद्र सरकारमध्ये देखील यासंदर्भात एक समिती तयार केली आहे. त्याचाही निर्णय लवकरच अपेक्षित आहे. त्यामुळं सध्या तरी कर्मचारी संघटनांनी संप करू नये, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. तसेच जुनी पेन्शनची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट 2032 साली सुरू होणार आहे. त्यामुळं आजच लगेच काही तो प्रश्न ऐरणीवर आलेला नाही. तथापि त्याच्यावर लवकर निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका आणि तशी मानसिकता असल्याचं ते म्हणाले आहेत.



आयोगावर राजकीय कार्यकर्ते :मागच्या सरकारच्या काळात जेव्हा राज्य मागासवर्ग आयोग तयार झाला, तेव्हाच्या तीन राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना आयोगाचा सदस्य केला. खर म्हणजे आयोगाचे सदस्य अभ्यासकांना करायचे असते. आमच्या काळातही आयोग तयार झाला होता, पण आम्ही एकही कार्यकर्ता घेतला नाही. सदस्याने राजीनामा दिल्याबरोबर पहिली भेट शरद पवार यांची घेतली, कारण त्यांची नियुक्ती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आयोगावर केली होती. हा विभागच माझ्याकडे येत नाही, त्याच्यामुळं या संदर्भात माझा दबाव असण्याचं कारण नाही. काय सर्वे करावा, कसा सर्वे करावा, कोणाकडून करावा हे देखील आयोग ठरवते. माझ्याशी कधीही या संदर्भात आयोगाची चर्चाही झालेली नाही. त्यामुळं हे पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित अशा प्रकारचं स्टेटमेंट असल्याचं फडणवीस म्हणाले. मात्र, एक गोष्ट निश्चित आहे की, काही सदस्य राजीनामे देत आहेत. अजूनही एक दोन सदस्य असे आहेत की, ज्यांचा हा डाव नक्की आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागू नये, असा त्यांच्या पॉलिटिकल मास्टर प्लॅन आहे.


पुराव्याच्या आधारे चौकशी : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian Death Case) चौकशीची मागणी मागच्या अधिवेशनामध्ये झाली होती. त्यासंदर्भात शासनाने आपली भूमिका मांडली आहे. जे काय पुरावे आलेले आहेत ते आम्ही तपासून बघू आणि त्या संदर्भात आम्ही पोलीस विभागाला सूचना केल्या आहेत.




महामंडळ सुरू करण्याची प्रक्रिया : राज्यातील वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय मागच्या सरकारने केला होता, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्या संदर्भातला निर्णय घेतला. निर्णय घेऊन तो आता केंद्र सरकारकडे गेला आहे.



शरद पवार यांना शुभेच्छा: शरद पवार (Sharad Pawar) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. मला असं वाटतं की, शेवटी ते महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. आमचे वैचारिक विरोधक आहेत. त्याच्यामुळं निश्चितपणे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (Sharad Pawar Birthday) आहेत.


हेही वाचा -

  1. ललित पाटील प्रकरणात कोणालीही सोडणार नाही - देवेंद्र फडणवीस
  2. देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी
  3. जुन्या पेन्शन योजनेवरून सरकारमध्ये मतभेद? अजित पवार म्हणाले निवडणुकीपूर्वी घेणार निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details