महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadnavis birthday : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे भूषण की कलंक, कार्यकर्त्यांनी लावले बॅनर्स - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस एकाच दिवशी आहे. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या समर्थकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बॅनर लावले आहेत. यातील एका चौकामधील एका बॅनरने सर्वाचे लक्ष वेधले आहे.

देवेंद्र फडणवीस नागपूरचे भूषण की कलंक
देवेंद्र फडणवीस नागपूरचे भूषण की कलंक

By

Published : Jul 22, 2023, 2:26 PM IST

Updated : Jul 22, 2023, 7:54 PM IST

ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा

नागपूर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे, यानिमित्ताने नागपूरच्या विविध चौकात कार्यकर्त्यांनी काही बॅनर्स लावले आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरसाठी कलंक आहे की भूषण असा थेट प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे वाढदिवस देखील एकाच दिवशी असल्याने काही कार्यकर्त्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचे बॅनर लावले असून त्यावर ही दोस्ती तुटायची नाही असा आशय लिहून शुभेच्छा दिल्या आहेत.

उद्धव ठाकरेंवर निशाणा : काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कमालीची आक्रमक झाले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले होते. उद्धव ठाकरेंच्या विधानावरुन ठाकरे गटाची शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दरम्यान हा मुद्दा परत एकदा चर्चेत आला आहे. ते म्हणजे नागपूरमध्ये लागलेले देवेंद्र फडणवीसांचे बॅनर्स. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे कलंक की भूषण अशा आशयाचे बॅनर नागपूरच्या चौकात लावण्यात आले आहेत. शहरातील मेडिकल चौक परिसरात शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देणारे देवेंद्र फडणवीस हे नागपूरसाठी कलंक की भूषण अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. या होर्डिंग्जमधून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे. हे बॅनर कोणी लावले त्याचे नाव नाही. या फक्त शेतकऱ्याचा फोटो आहे. विशेष म्हणजे यावर फडणवीस यांचाही फोटो नाही. यामुळे हे बॅनर चर्चेत आले आहे.

ही दोस्ती तुटायची नाय :अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. हा एकप्रकारे योगायोग असल्याने काही कार्यकर्त्यांनी काही हटके शुभेच्छा देण्याची संधी सोडली नाही. नागपुरातील एका बॅनर्सवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या बॅनर्सवर ही दोस्ती तुटायची नाय, असे लिहिले आहे. तसेच या बॅनर्सवर दोन्ही नेत्यांचा पहाटेच्या शपथविधीचा फोटो लावण्यात आला आहे. यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

हेही वाचा -

  1. अजित पवार-देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री द्वयांच्या वाढदिवसाचा सोहळा झालाच नाही...
  2. Deputy Chief Ministers Birthday : दोनही उपमुख्यमंत्र्यांचा एकाच दिवशीवाढदिवस, राष्ट्रवादीचा अजित उत्सव, भाजपची कार्यकर्त्यांना तंबी
Last Updated : Jul 22, 2023, 7:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details